शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक वनहक्क संवर्धनासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:19 IST

सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारासाठी ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.

ठळक मुद्देगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ गावांचा समावेशसंवर्धन करणारा देशातील पहिला उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य करारासाठी ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.गडचिरोली येथे सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन यासंदर्भात चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे, सहसंचालक दिवाकर केतकर, कौशल्य विकास संचालक किसन धुर्वे, वनहक्क साधन व्यक्ती संकेत जोशी, संदीप चव्हाण, वनहक्क कायदा व प्रकल्पाच्या जिल्हा व्यवस्थापक सोनम येरमे उपस्थित होते.यावेळी ग्रामसभेच्यावतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थेच्यावतीने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी आणि आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ आणि नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ च्या अंमलबजावणीअंतर्गत वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. सामूहिक वनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामसभेचे बळकटीकरण आवश्यक आहे. वनांवर उपजीविका साधन उपलब्ध करून देणे तसेच वनांचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, संरक्षण, पुनर्निर्माण करण्याकरिता संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालय हा पथदर्शी प्रकल्प राबवीत आहे.स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ ग्रामसभांसाठी १ कोटी ३३ लाख ४५ हजार ७९४ रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये गडचिरोली येथील ‘वृक्षमित्र’ स्वयंसेवी संस्थेला ३९ गावांसाठी ६९ लाख ३४ हजार ८५१ रुपये तर कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेला ९ गावांसाठी १६ लाख २ हजार २१६ रुपये तसेच एरंडी येथील ‘सृष्टी’ संस्थेला २४ गावांसाठी ४२ लाख ६९ हजार ५७३ रुपये प्रकल्प निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथील विरुर तालूका राजुरा येथील ‘पर्यावरण मित्र’ या स्वयंसेवी संस्थेला ३ गावांसाठी ५ लाख ३९ हजार १५४ रुपयांचा प्रकल्प निधी मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक नंदिनी आवडे यांनी दिली.गडचिरोली येथील ‘वृक्षमित्र’ या स्वयंसेवी संस्थेचे मोहन हिराबाई हिरालाल, एरंडी येथील ‘सृष्टी’ संस्थेच्यावतीने केशव गुरुनुले, कुरखेडा येथील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने डॉ. गोगुलवार तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर, तालुका राजुरा येथील पर्यावरण मित्र या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने विजय देठे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.अमरावती जिल्ह्यातून अचलपूर येथील ‘खोज’ या स्वयंसेवी संस्थेला तसेच यवतमाळ येथील ‘ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट’ आणि पांढरकवडा तालुका, केळापूर येथील ‘नवी उमेद’ या स्वयंसेवी संस्थांसोबत सामूहिक वनहक्क संवर्धन त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

 

 

टॅग्स :forestजंगलGadchiroliगडचिरोली