शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

हक्कासाठी आदिवासी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:56 IST

‘हमे चाहीए आझादी...’ अशा घोषणा देत सोमवारी हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाने प्रशासनाचे टेन्शन वाढविले होते.

ठळक मुद्देमोर्चाने वाढविले पोलिसांचे टेन्शन : डीबीटी योजनेविरोधात तीव्र असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हमे चाहीए आझादी...’ अशा घोषणा देत सोमवारी हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाने प्रशासनाचे टेन्शन वाढविले होते. शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी मिळणारा निधी थेट बँक खात्यात जमा (डीबीटी) करण्याच्या सेवेच्या विरोधात शसनाविरोधात खदखदणारा असंतोष मोर्चाच्या माध्यमातून उफाळून आला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून आलेल्या पाच हजाराच्यावर आदिवासी विद्यार्थ्यांनी शांततेने काढलेल्या मोर्चामुळे पंचशील चौक ते संविधान चौकापर्यंत वाहतुकीचा पुरता खोळंबा झाल्याने पोलिसांना चांगलीच दमछाक करावी लागली.आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ-नागपूर या बॅनरखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. नागपूर, भंडारा, गांदिया, चंद्रपूर,ाडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात राहणारे विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते. विद्यमान शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या पं. दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत डीबीटी सेवेविरोधात प्रचंड संताप व्यक्त करीत मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी राज्य शासन तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विरोधात नारेबाजी केली. मोर्चात नेता कुणी नव्हता तर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने पेटविलेले हे आंदोलन होते.संघटनेचे सचिव गजानन कुमरे यांनी नव्या योजनेबाबत माहिती देत नाराजीचे कारण स्पष्ट केले. राज्यात ६० हजाराच्यावर विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. आजवर शासकीय वसतिगृहात राहणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना लागणारे बेडिंग, स्टेशनरी, पुस्तके, गणवेश आदी शैक्षणिक साहित्य शासनातर्फे मोफत पुरविले जात होते. मात्र विद्यमान शासनाने नवीन जीआर काढून या खर्चाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) सेवेअंतर्गत खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली. मात्र ही योजना विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.वास्तविक या योजनेअंतर्गत मेडिकल व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ६ हजार तर इतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ४५०० रुपये दिले जाणार आहेत. उपयोगी साहित्य खरेदीसाठी हा निधी अत्यल्प असल्याचे कुमरे यांनी सांगितले. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याने डीबीटीचा निधी नियमित जमा होईल याचा भरवसा काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.अशा योजनेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना विकासापासून वंचित ठेवण्याचे हे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. डीबीटी योजना त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे सुविधा देण्यात याव्या, तीन वर्षांपासून खोळंबलेली शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, नवीन जीआरनुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या, प्रवेशासाठी आॅनलाईन सेवा बंद करून आॅफलाईन सेवा कायम ठेवावी आदी मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. सर्व आंदोलनकारी विद्यार्थी संविधान चौकात जमा झाले.त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांमार्फत राज्यपालांकडे निवेदन सोपविले. या शिष्टमंडळात गजानन कुमरे, मुकेश नरोटे, रणजित सयाम, सारिका वट्टी, शिवकुमार कोकोडे, डॉ. भूपेश उईके, दिनेश मडावी आदी उपस्थित होते.पोलिसांची दमछाकदुपारी १२.३० वाजता यशवंत स्टेडियम, धंतोली येथून मोर्चा सुरू झाला. विभागातील सहा जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले. पोलीस प्रशासनाला या संख्येचा अंदाज नव्हता. त्यामुळे मोर्चाने पंचशील चौकापासूनच वाहतुकीची दाणादाण उडविली. पंचशील ते सीताबर्डीचा संपूर्ण परिसर अर्धा-पाऊण तास वाहनांनी ब्लॉक झाला होता. पुढे पोलिसांनी स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र संविधान चौकापर्यंतचा मार्ग एका बाजूने बंद करावा लागल्याने वाहतूक विस्कळली होती.