शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाच्या उपचारासाठी आदिवासी विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:47 IST

नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, असे असताना शासनाने ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे नाव न घेता मेडिकलमधील कर्करोगावरील उपचारांच्या सोयी निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमाती उपयोजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीच्या विनियोगाला गुरुवारी मान्यताही दिली आहे.

ठळक मुद्देमेडिकल : विभागाच्या अनुसूचित जमाती उपयोजनेतून मिळणार निधी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतीक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, असे असताना शासनाने ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चे नाव न घेता मेडिकलमधील कर्करोगावरील उपचारांच्या सोयी निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमाती उपयोजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीच्या विनियोगाला गुरुवारी मान्यताही दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची घोषणा २०१२ मध्ये झाली असली तरी तूर्तासतरी हा प्रकल्प कागदावरच आहे. या इन्स्टिट्यूटला घेऊन दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर इन्स्टिट्यूूट उभारावी, असे निर्देश दिले आहेत. परंतु पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी होत असतानाही इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला सुरुवातही झाली नाही.विशेष म्हणजे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभाग यांच्या नियंत्रणाखाली अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या अनुक्रमे विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजनेतून २५ कोटी रुपये अनुदान ‘लिनियर एक्सलेटर’साठी मंजूर करण्यात आले. परंतु या शासन निर्णयात ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’चा साधा उल्लेखही नाही. बांधकामापूर्वीच यंत्राचा निधी आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असताना आता मेडिकलमध्ये कर्करोग उपचारांच्या सोयी निर्माण करण्यासाठी विभागाच्या अनुसूचित जमाती उपयोजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगाला शासनाने मंजुरी दिली आहे. यातही ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’असा उल्लेख नाही. हा निधी यंत्र सामुग्री व साधन सामुग्रीवर खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग