शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ट्रायथलॉन शर्यत; सुनीता धोटे ‘लेडी आयर्नमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:40 IST

वयाच्या ४७ व्या वर्षी डॉ. सुनीता धोटे यांनी मध्य भारतातील पहिल्या लेडी आयर्नमॅन (७०.३) बनण्याचा मान मिळविला आहे.

ठळक मुद्देपहिल्यांदाच मिळविला मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाच्या ४७ व्या वर्षी डॉ. सुनीता धोटे यांनी मध्य भारतातील पहिल्या लेडी आयर्नमॅन (७०.३) बनण्याचा मान मिळविला आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या आव्हानात्मक ट्रायथलॉन शर्यतीत त्यांनी १.०९ किमी जलतरण, ९० किमी सायकलिंंग आणि २१ किमी धावण्याच्या शर्यतीचा टप्पा ७ तास ४० मिनिटात सर केला. तिन्ही शर्यतीत त्यांना एकूण ११३ किमी अंतर पूर्ण करावे लागले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ८ तास ३० मिनिटांचा कालावधी निर्धारित करण्यात आला होता. स्वत:चा अनुभव सांगताना रामदेवबाबा कमला नेहरूअभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या धोटे म्हणाल्या, ‘हा अनुभव माझ्यासाठी खरोखर आव्हानात्मक होता. काही दिवसांआधी सायकलिंग करताना मला अपघात झाला होता. तरीही सैनिकाची मुलगी असल्याने हार मानण्याचा माझा स्वभाव नाही. जिद्दीने ही शर्यत पूर्ण केली. वाढत्या वयातही आरोग्य चांगले राखण्यासाठी नियमित एक तास व्यायामकरा,ही भावना रुजविण्याच्या हेतूने माझा हा प्रयत्न आहे. ’धोटे यांनी याआधी २०१४ ला माँट्रियल येथे १५ व्या फिना विश्व जलतरण स्पर्धेत मास्टर्स गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी नागपूर ते पुड्डूचेरी असा सायकल प्रवास केला. त्यासाठी त्यांच्या नावाची आशिया बुक रेकॉर्डमध्येदेखील नोंद झाली आहे. दररोज तीन तास आणि रविवारी पाच तास असा त्यांचा सराव चालतो. अंबाझरी तलावात त्यांचा पोहण्याचा सराव चालतो. दुबईत १०७ देशांतील २५०० स्पर्धकांमधून त्यांनी स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविला. या स्पर्धेत शंभर महिला स्पर्धक होत्या, त्यातही भारतातून केवळ चार महिला स्पर्धकांनी हजेरी लावली होती, असे धोटे यांनी सांगितले. यावेळी गणेश क्षीरसागर आणि डॉ. राजेंद्र जैस्वाल उपस्थित होते.

‘हा अनुभव माझ्यासाठी आव्हानात्मक होता. त्यादृष्टीने योजनेंतर्गत सराव केला. अंबाझरी तलावात पोहल्यानंतर सायकलिंग आणि धावण्यासाठी मैदानांसह रस्त्यांचा उपयोग केला. दुबईबाहेरील रस्त्यांवर वालुकामय भागात रेस पूर्ण करताना अतिउत्साह टाळला. नियंत्रितपणे सहभाग आणि नागपूरकरांच्या आशीर्वादामुळे मला फार कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्यात यश आले.’- डॉ. सुनीता धोटे

टॅग्स :Socialसामाजिक