शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘माझी मेट्रो’ची ‘ट्रायल रन’ दसºयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:28 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते एअरपोर्ट साऊथ स्टेशनदरम्यान ५.०४ कि़मी. मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ ३० सप्टेंबर अर्थात दसºयाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन : ५.०४ कि़मी. धावेल गाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत मिहान डेपो ते एअरपोर्ट साऊथ स्टेशनदरम्यान ५.०४ कि़मी. मेट्रो रेल्वेची ‘ट्रायल रन’ ३० सप्टेंबर अर्थात दसºयाच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ‘माझी मेट्रो’ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील, अशी घोषणा महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने मंगळवारी केली. यामुळे नागपूरच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.गेल्या दोन महिन्यांपासून ‘ट्रायल रन’च्या दिशेने २४ तास काम सुरू आहे. ‘ओएचई’चे (ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन) काम पूर्ण झाले आहे. हैदराबाद येथून आणलेल्या ‘बुलंद’ नावाच्या इंजिनच्या माध्यमातून रुळाची यशस्वी तपासणी करण्यात आली. याशिवाय हैदराबाद येथून लीजवर मागविण्यात आलेले मेट्रो रेल्वेचे तीन कोच बुलंदच्या माध्यमातून रुळावर चालविण्यात आले. याशिवाय विविध प्रकारच्या प्रायोगिक चाचण्या (तांत्रिक) घेण्यात आल्या. विविध तपासण्यांनंतर आरडीएसओने (लखनौ) ट्रायल रनसंदर्भात सर्व पैलूंचा अभ्यास करून कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र आणि पुढील प्रक्रियेसाठी अनुकूल अहवाल दिला. दोन वर्षांत मेट्रो रेल्वेची ट्रायल रन घेण्याचे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने प्रारंभी दिलेले आश्वासन यानिमित्ताने प्रत्यक्षात येणार आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर सोपविली आहे. त्यातील पहिला टप्पा केवळ सव्वादोन वर्षांत दसºयाला पूर्ण होणार आहे.दसºयाला माझी मेट्रोचे उद्घाटन पारंपरिक पद्धतीने आणि जनतेच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात येणार आहे. यावेळी जनतेला माझी मेट्रोचे अवलोकन प्रत्यक्षपणे करता येईल. जनतेच्या सुविधेसाठी या कार्यक्रमाचे प्रसारण विविध माध्यमातून करण्यात येणार आहे.उद्घाटनप्रसंगी ‘महाकार्ड’चे उद्घाटन पाहुण्यांचे हस्ते होणार आहे. दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील मुलांना प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना माझी मेट्रोच्या ट्रायल रनचा आनंद जवळून अनुभवता येईल. महाकार्डमुळे नागरिकांना घर ते मेट्रो स्टेशन आणि तेथून फिडर सर्व्हिस व अन्य साधनांद्वारे निर्धारित ठिकाणी सुलभरीत्या पोहोचता येईल. टॅक्सी फेअर, पार्किंग शुल्क, मेट्रो तिकिटांची खरेदी, मॉल, रेस्टॉरंटमध्ये या कार्डाचे चलन राहील. जीवन सुरक्षा, आर्थिक बचत आणि सन्मानजनक प्रवासासाठी माझी मेट्रो फायद्याची ठरणार आहे.