शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुनील केदारांविरुद्धचा खटला तीन महिन्यात निकाली काढा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 20:48 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध (संजय अग्रवाल वगळता) प्रलंबित कोट्यवधी रुपयाच्या रोखे घोटाळ्याचा खटला येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाला दिला. तसेच, खटल्यावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर एक महिन्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.

ठळक मुद्देजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध (संजय अग्रवाल वगळता) प्रलंबित कोट्यवधी रुपयाच्या रोखे घोटाळ्याचा खटला येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाला दिला. तसेच, खटल्यावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी प्रकरणावर एक महिन्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष या प्रकरणावर सुनावणी झाली. इतर आरोपींमध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर यांचा समावेश आहे. यासंदर्भात ओमप्रकाश कामडी व इतरांनी अर्ज दाखल केला आहे. आरोपी रोखे दलाल संजय अग्रवाल (मुंबई) वगळता सुनील केदार व इतरांविरुद्धचा खटला तातडीने निकाली काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला होता. परंतु, त्या आदेशाचे काटेकोर पालन झाले नाही, असे अर्जदारांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे गेल्या तारखेला न्यायालयाने खटल्याचा रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, बुधवारी खटल्याचा रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात आला. त्यासोबत मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी हा खटला दोन महिन्यांत निकाली काढण्याचे हमीपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हा खटला तीन महिन्यात निकाली काढण्यास सांगितले.संजय अग्रवाल यांच्या एका प्रकरणात मुंबई मुख्यपीठाने १९ डिसेंबर २०१४ रोजी या खटल्यावर स्थगिती दिली होती. त्यामुळे खटला थांबवून ठेवण्यात आला होता. परंतु, नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर अग्रवाल वगळता इतर आरोपींविरुद्ध खटला चालविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. असे असताना खटला तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात आले नाही, असा अर्जदारांचा आरोप आहे. अर्जदारांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.दोषारोप व शिक्षेची तरतूद‘सीआयडी’ने २२ नोव्हेंबर २००२ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तेव्हापासून हा खटला प्रलंबित आहे.त्यात आरोपींवर भादंविच्या कलम ४०६(विश्वासघात),४०९ (शासकीय नोकर, बँक अधिकारी आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१(बनावट दस्तावेज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे), ३४(समान उद्देशाने एकत्र येणे), असे दोषारोप ठेवण्यात आले आहेत. भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात)मध्ये कमाल तीन वर्षे, कलम ४०९(शासकीय नोकर, बँक अधिकारी आदींद्वारे विश्वासघात)मध्ये किमान १० वर्षे व कमाल जन्मठेप, कलम ४६८ (फसवणुकीसाठी बनावट दस्तावेज तयार करणे)मध्ये कमाल सात वर्षे, कलम ४७१(बनावट दस्तावेज खरे भासविणे)मध्ये कमाल दोन वर्षे तर, कलम १२०-ब (कट रचणे)मध्ये किमान दोन वर्षे ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. सदर गुन्हे सिद्ध झाल्यास न्यायालयाद्वारे आरोपींना अशी शिक्षा केली जाऊ शकते.असे आहे प्रकरण२००१-२००२ मध्ये बँकेने होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSunil Kedarसुनील केदार