शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

त्रिनेत्र, ‘युटीसीएस’ करणार धुक्याचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:54 IST

हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणेचा वापर नजीकच्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे सदस्य (स्टाफ) डी. के. गायेन यांनी केले.

ठळक मुद्देडी. के. गायेन यांची माहिती : रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृतीसाठी शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रणेचा वापर नजीकच्या काळात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रेल्वे बोर्डाचे सदस्य (स्टाफ) डी. के. गायेन यांनी केले.विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या संवाद सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, हिवाळ्यात रेल्वेगाड्यांच्या लेटलतिफीसाठी रेल्वे बोर्ड त्रिनेत्र ही यंत्रणा अवलंबण्याचा विचार करीत आहे. यानुसार धुक्याच्या परिस्थितीत पुढे सिग्नल येणार आहे, याची माहिती लोकोपायलटला मिळेल. त्यानुसार तो सिग्नल येण्यापूर्वी आपला वेग कमी करेल. ‘युटीसीएस’ या यंत्रणेनुसार लोकोपायलटला इंजिनमध्येच थांबायचे की पुढे जायचे, किती वेगाने जायचे याची माहिती मिळेल. सध्या रेल्वेत १३ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे आरोग्य सांभाळणे रेल्वेची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक विभागात वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याप्रति जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. सक्षम प्रकल्पानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ते जेथे काम करतात त्या ठिकाणी किंवा दुसऱ्या संस्थेत प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय स्कील इंडिया या प्रकल्पानुसार ३० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रेल्वेत सफाई तसेच इतर बाबींचे कंत्राट खासगी कंत्राटदारांना देण्यात आलेले आहे. कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करीत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. कामगारांचे वेतन बँकेत जमा करुन त्या बाबतची माहिती पब्लिक डोमेनवर अपलोड करणे सक्तीचे करण्यात आले असून ईस्टर्न आणि साऊथ ईस्टर्न रेल्वेत त्याची चाचपणी सुरू असून ही यंत्रणा यशस्वी झाल्यास ती देशभरात लागू करण्यात येणार आहे. रेल्वेगाड्यात प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे गायेन यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन. स्वामीनाथन, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील, प्रसिद्धी निरीक्षक अनिल वालदे उपस्थित होते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीcentral railwayमध्य रेल्वे