शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवासात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार : कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:06 IST

सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

ठळक मुद्देमेडिकलचे ३२, मेयोेचे १८ रुग्ण उपचारासाठी दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. विशेष म्हणजे, रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान मेडिकलने २२ तर सोमवारी १० असे ३२ रुग्ण, मेयोने आज १८ असे एकूण ५० रुग्ण या सेंटरमध्ये उपचाराला आहेत.कोरोनाचे संक्रमण खंडित करण्यासाठी निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत करण्याचे ‘आयसीएमआर’ने नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल करण्याच सूचना आहेत. त्यानुसार मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी ६०० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ तयार केले. मात्र येथे सर्वच प्रकारच्या रुग्णांना ठेवले जात होते.‘एचडीयू’ व ‘आयसीयू’मध्ये सुद्धा लक्षणे नसलेली व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जात होते. अशा रुग्णांवर विशेष उपचाराची गरज नसताना त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळ खर्ची होत होता. अखेर गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आमदार निवासाला कोविड केअर सेंटर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हालचालींना वेग आला. क्वारंटाईन असलेल्या संशयित रुग्णांना १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुटी देत सेंटरसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करण्यात आल्या. सध्या इमारत क्रमांक ‘बी’मध्ये १०० खाटांचे हे सेंटर उभारण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. नितीन गुल्हाने आणि त्यांची चमू सेंटरमध्ये आपली सेवा देत आहेत.मेयो, मेडिकलने तपासल्यावरच रुग्णाची ‘सीसीसी’मध्ये रवानगीकोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची मेयो, मेडिकलने तपासणी करून त्यांनी रेफर केल्यावरच आमदार निवासाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये पाठविले जाणार आहे. या सेंटरमध्ये आरोग्य विभागासोबतच महापालिकेचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवक सेवा देणार आहेत. २४ तास ‘ऑनकॉलवर’ मेयो, मेडिकलचे डॉक्टर असणार आहेत. रुग्णाला लक्षणे दिसताच किंवा प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच तातडीने रुग्णवाहिकेतून मेयो, मेडिकलमध्ये पाठविण्याची सोय राहणार आहे.

टॅग्स :MLA Hostelआमदार निवासcorona virusकोरोना वायरस बातम्या