शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दंत रुग्णांवर एकसमान उपचार हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:33 IST

जगभरातील सर्व देशांमध्ये दातांशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यात नव्या संशोधनाची भर पडत आहे. या संपूर्ण ज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे.

ठळक मुद्देमॅक्सिलोफेशियल सर्जरीवरील परिषदेचा सूर : १३ देशातील प्रतिनिधींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील सर्व देशांमध्ये दातांशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यात नव्या संशोधनाची भर पडत आहे. या संपूर्ण ज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे. परिणामी, अद्ययावत उपचाराच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. यामुळे भविष्यात जगभरातील रुग्णांना एकसमान दातांचे अद्ययावत उपचार उपलब्ध केल्या जाऊ शकतील, असा सूर मॅक्सिलोफेशियल सर्जरीवरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित वक्त्यांचा होता.असोसिएशन आॅफ ओरल अ‍ॅन्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स आॅफ इंडियाच्यावतीने तीन दिवसीय ‘क्रॅनिओ व मेक्जिेलोफेशियल सर्जरी’ परिषदेला गुरुवारपासून सुरुवात झाली. उद्घाटन भारतीय दंत चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डा. दिव्येंदू मुजुमदार यांच्या हस्ते झाले. यावेळी मॅक्सिलोफेशियल सर्जन्सच्या संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. ह्युलिओ असेरो, संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक समितीचे प्रमुख प्रा. डॉ. मॅनलिओ गॅली, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. रामक्रिष्ण शेणॉय, सचिव डॉ. अभय दातारकर आदी उपस्थित होते. या परिषदेला भारतासह जगातील १३ देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.प्रा. डॉ. ह्युलिओ असेरो म्हणाले, चेहºयाच्या विद्रूपतेवर मॅक्सिलोफेशियल सर्जरी वरदान ठरली आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील युरोप, अमेरिका, जपान, चीन, स्पेन, ब्राझील, भारतासह अनेक देशात बरेच नवनवीन उपचार उपलब्ध आहेत. बहुसंख्य ठिकाणी सुरू असलेल्या संशोधनाचे, कौशल्याचे आदान-प्रदानही होत आहे. या प्रक्रियेतून सर्व देशातील दंतरुग्णांना अद्ययावत उपचार भविष्यात मिळेल, असेही ते म्हणाले. प्रा. डॉ. मॅनलिओ गॅली म्हणाले, जगाच्या विविध देशामधील दंत अभ्यासक्रमात एकवाक्यता नाही. यामुळे हे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत करून ते एकसमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता जगभरातील मॅक्सिलोफेशियलच्या संघटनांना एकत्र आणण्यात आले आहेत.या संघटनांना भारतीय दंत परिषदेकडूनही मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले. या परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. शेणॉय, डॉ. दातारकर यांच्यासह डॉ. रवी दांडे, डॉ. नीरज खरे, डॉ. मधुमती धावडे, डॉ. आर.एम. बोरले परिश्रम घेत आहेत.अमेरिकेसारखेच भारतातही उपचारअमेरिकेच्या एका नामांकित विद्यापीठाचे कुलगुरू घाली इलियास घाली म्हणाले की, अमेरिकाएवढेच अद्ययावत उपचार भारतातही होतात. दंत उपचाराला घेऊन दोन देशांची तुलना करणे योग्य नाही. भारतात मुखाच्या कर्करुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत इतर दंतरुग्ण जास्त आढळतात. त्यामुळे भौगोलिक गरजेनुरूप संबंधित देशात या क्षेत्राची प्रगती होत आहे.