शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

हे विद्यापीठ आहे की खजिन्याचे भांडार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्येचे मंदिर मानण्यात येते.

ठळक मुद्देप्रशासनाच्या सुरक्षेसाठी कोट्यवधींचा खर्च : मूलभूत समस्या मात्र कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विद्येचे मंदिर मानण्यात येते. मात्र विद्येच्या या मंदिराची सुरक्षा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत विद्यापीठातील वसतिगृहे, परीक्षा भवन येथेदेखील सुरक्षा वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सुरक्षेच्या आग्रहापोटी विद्यापीठाला दरवर्षी सुमारे साडेतीन कोटींहून अधिकचा खर्च करावा लागणार आहे. खर्चाचा आकडा पाहिला तर हे विद्यापीठ आहे की येथे एखादा खजिना दडला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने, अभ्यागतांचा प्रवेश, वसतिगृहांमधील नियमबाह्य पद्धतीने बाहेरील विद्यार्थ्यांचा संचार यामुळे सुरक्षाव्यवस्थेच्या मर्यादा उघड झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’कडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यापीठाच्या वित्त समितीच्या बैठकीत या आशयाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेचीदेखील मान्यता मिळाली. त्यानंतर या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ‘एमएसएफ’कडे (महाराष्ट्र सिक्युरीटी फोर्स) ही जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार मुख्य प्रशासकीय इमारतीची सुरक्षा व्यवस्था ‘एमएसएफ’च्या सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतली. ‘एमएसएफ’कडून प्रशिक्षित सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यासाठी वर्षाला अंदाजे एक कोटींचा खर्च होणार आहे.दुसºया टप्प्यात विद्यापीठ इतर ठिकाणीदेखील सुरक्षाव्यवस्था वाढविणार आहे. यात परीक्षा विभाग, विधी विद्यापीठ परिसर तसेच ‘कॅम्पस’जवळील वसतिगृहे यांचा समावेश आहे. यासाठी २९ आॅगस्ट रोजी होणाºया खरेदी समितीपुढे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या टप्प्यासाठी वर्षभराचा सुरक्षेचा खर्च हा २ कोटी ६३ लाख रुपये इतका राहणार आहे. म्हणजेच दोन्ही टप्पे मिळून वर्षाकाठी सुरक्षारक्षकांवर विद्यापीठाला साडेतीन कोटींहून अधिक खर्च करावा लागणार आहे. एकीकडे अनेक विभागांत मूलभूत सुविधांचा अभाव असताना कोट्यवधींचा खर्च कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कंपनीच ठरविते सुरक्षारक्षकांची संख्यासाधारणत: एखाद्या ठिकाणी किती सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे हे तेथील प्रशासन ‘एजन्सी’ला सांगते. मात्र ‘एमएसएफ’कडून सुरक्षेसाठी किती लोक लागतील हे स्वत:च ठरविण्यात येते. तितक्या सुरक्षारक्षकांचाच कंत्राट करावा लागतो. विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.