शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:12 IST

गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे.

ठळक मुद्देदुकाने, रेस्टॉरंट सहज शोधता येणार विविध वैशिष्ट्यांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. टू व्हीलर मोड, प्लस कोड्स, मॅप्स गो, मॅप्सवर स्थानिक भाषा, स्थानिक जागा शोधणे, रिअल टाइम लोकेशन शेअरिंग, मल्टी स्टॉप डायरेक्शन, रिअल टाइम वाहतूक परिस्थिती आणि स्थानिक गाईड्स अशा सगळ्या वैशिष्ट्यांमुळे नागपुरात फिरणे आता अधिक वेगवान आणि सोयीचे होणार आहे.गुगल मॅप्सचा उपयोग प्रवासाचे नियोजन, हवे असलेले ठिकाण शोधणे तसेच प्रवासाचा अनुभव अधिक सुखकारक करण्यासाठी होणार आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे. या मोडमुळे चालकांना मोटर, बस आणि ट्रकसाठी नसलेले मार्र्ग कळू शकतील. याशिवाय रिअल टाइम ट्रॅफिकप्रमाणे खरोखरच वाहतूक सुरू आहे का, हे बघता येईल. यामध्ये अनेक पर्याय आहेत. याशिवाय ‘मॅप्स गो’चा वापर कमी आधुनिक अ‍ॅन्ड्राईड फोन्सवरदेखील सुरळीत करता येणार आहे. मॅप्समधील प्लस कोडचा वापर ठिकाणे शोधण्यासाठी शेअर करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे कुणाचाही पत्ता क्षणात सापडणार आहे. मॅप्समध्ये घर आणि कामाचे ठिकाणी अतिशय सुलभतेने सेट करून सुरळीतपणे दळणवळण करता येणार आहे.फक्त ‘ड्रायव्हिंग’ या टॅबवर क्लिक केल्यास सर्वोत्तम मार्ग आपोआप दिसणार आहे. मॅप्समधील व्हाईस नेव्हिगेनच्या साहाय्याने ट्रॅफिक अलटर््स पाहता येतील. कुठे वळायचे, कोणत्या मार्गावर जायचे, एखादा अधिक चांगला मार्ग आहे का, अशी माहिती मिळू शकते.गुगलने सात भाषांमध्ये व्हाईस नेव्हिगेशन आणले आहे. मॅप्सच्या साहाय्याने अवतीभोवतीच्या ठिकाणांची माहिती घेता येते आणि आपापले अनुभव इतरासोबत शेअर करता येतात. रेस्टॉरंट, हॉटेल्स, फार्मसीज आणि अन्य ठिकाणे शोधून ते कधी सुरू असतात याचीही माहिती मिळू शकते. गुगल मॅप्सवर नवीन ठिकाणांची भर घालून स्थानिक गाईड म्हणून भूमिका बजावू शकतात, अशी माहिती गुगल मॅप्स इंडियाचे प्रोग्रॅम मॅनेजर अनिल घोष आणि प्रॉडक्ट मॅनेजर नेहा वाईकर यांनी दिली.

टॅग्स :googleगुगल