शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यात्राकर निधी इतर विकासकामांवर खर्च

By admin | Updated: January 4, 2015 00:57 IST

स्थानिक पालिका प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात अपयशी ठरले आहे. त्यातच पालिकेने गेल्या तीन वर्षात मिळालेले ७५ लाख रुपयांचे यात्राकर अनुदान यात्रेकरुंच्या सोयीव्यतिरिक्त

मधुकरराव किंमतकर : नगरसेवकांच्या उपोषणाचा दुसरा दिवसरामटेक : स्थानिक पालिका प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात अपयशी ठरले आहे. त्यातच पालिकेने गेल्या तीन वर्षात मिळालेले ७५ लाख रुपयांचे यात्राकर अनुदान यात्रेकरुंच्या सोयीव्यतिरिक्त इतर कामांवर खर्च केले, असा आरोप माजी मंत्री अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांनी केला. अ‍ॅड. किंमतकर यांनी शनिवारी दुपारी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलत होते. उपोषणाचा दुसरा दिवस होता. विशेष म्हणजे ते १९५८ ते १९६३ या काळात रामटेक पालिकेत नगरसेवक होते.किंमतकर म्हणाले, आपण माहितीच्या अधिकारात गेल्या तीन वर्षात पालिकेला किती यात्राकर अनुदान मिळाले, याबाबत माहिती मागितली होती. हा निधी कुठे आणि कसा खर्च करावा, याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिलेल्या असतात. या सूचनांची माहिती मागितली. परंतु, ती देण्यात आली नाही. या पालिकेला २०११-१२ मध्ये ७ लाख ५० हजार रुपये, २०१२-१३ मध्ये २३ लाख ५८ हजार रुपये आणि २०१३-१४ मध्ये ४४ लाख ९१ हजार रुपये असे तीन वर्षांत एकूण ७५ लाख ९९ हजार रुपये यात्राकर अनुदान मिळाले. या अनुदानातून पालिकेने रामतलाई येथे लायटींगवर ४ लाख ६२ हजार रुपये खर्च केले. पालिका कार्यालय परिसरात हायमास्ट लाईटवर ८ लाख रुपये, आठवडी बाजार परिसरातील विद्युतीकरणावर ४ लाख २६ हजार रुपये, गांधी चौक ते शास्त्री चौकातील विद्युतीकरणावर ५ लाख ५३ हजार रुपये, गांधी चौक ते लंबे हनुमान विद्युतीकरणावर १० लाख ४९ हजार रुपये असा एकूण ७३ लाख ८९ हजार रुपयांचा खर्च यात्राकर अनुदानातून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गडमंदिराचे १ लाख रुपयांचे वीज बील सोडल्यास इतर कुठल्याही खर्चाशी यात्रेकरुंच्या सुविधेचा संबंध नसल्याचे किंमतकर यांनी स्पष्ट केले. इतर कामे ही यात्रेकर अनुदानात बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.ओमच्या देखाभाल व दुरुस्तीसाठी विदर्भ वैधानिक मंडळाने २ कोटींचा निधी दिला होता. ही वास्तु पालिकेकडे सोपविण्यात आली. २३ मार्च २०१० ला अवधेश तिवारी यांना ओमच्या देखभाल दुरुस्तीचा कंत्राट दिला. कंत्राटातील अटीनुसार ओमचा परिसर, कालीदास स्मारकाची देखभाल दुरुस्ती झाली नाही, असा आरोप किंमतकरांनी केला. अंबाळा येथे यात्री निवास बांधकामासाठी विदर्भ वैधानिक मंडळाच्या माध्यमातून १ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये दिले. हे यात्री निवास अपूर्ण आहे. या संदर्भात आपण उपविभागीय अधिकारी शेखरसिंह यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी अशोक बर्वे, शांता कुमरे, सुरेश कुमरे, ईसराईल शेख, भाऊराव रहाटे, नरेश महाजन, मोहंमद पठाण, विष्णू अमृते आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)