शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाघ वाचविण्यासाठी देशभ्रमण; ‘जर्नी फॉर टायगर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:22 IST

: वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे.

ठळक मुद्दे दास दाम्पत्य दुचाकीवर फिरून देताहेत संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ‘जर्नी फॉर टायगर’ या अभियानानुसार २१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी ते नागपुरात पोहोचले. वाघांचे संरक्षण करणे काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.रथीन्द्रोनाथ दास (४३) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास हे दोघेही १५ फेब्रुवारीला सॉल्टलेक कोलकाता येथून भारत भ्रमणासाठी निघाले. दास यांना लहानपणापासून वन्यजीव आणि निसर्गाप्रति आवड आहे. देशात वाघांची झपाट्याने कमी होत चाललेल्या संख्येबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु प्रत्यक्षात कृती करून नागरिकांना जागृत करण्यासाठी दास यांनी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. १५ फेब्रुवारीला ते पत्नीसह वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीवर निघाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दीव, मध्य प्रदेश येथून ते नागपुरात आले आहेत. येथून ते बोर, मेळघाट, ताडोबा, नागझिराला भेट देणार आहेत. जंगलाशेजारील गावात जाऊन ते तेथील नागरिकांना वाघ वाचविण्याचा संदेश देत आहेत. शाळा-महाविद्यालयात जाऊनही ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्यात ठिकठिकाणी वन अधिकारी मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वाघाचे संरक्षण करण्यासाठी या दाम्पत्याने सुरू केलेले अभियान खरोखरच मोलाचे आहे. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) नितीन काकोडकर यांनी दास यांची भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेले ‘ताडोबा द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक भेट दिले.जगभरात देणार वाघ वाचविण्याचा संदेशदास दाम्पत्याने जगात फिरून वाघ वाचविण्याचा संदेश देण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यापासून ते आपल्या जग भ्रमणाची सुरुवात करणार आहेत. यात म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, रशिया, काठमांडू, भूतान, बांगलादेश येथे वाघ वाचविण्याचा संदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ