शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर फेस रिकग्नाईज कॅमेरे करतील गुन्हेगारांना ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:02 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक २४० कॅमेरे लावण्यात येत आहेत. यात चेहरा (फेस रिकग्नाईज) ओळखणाऱ्या चार कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्व फलाटांच्या कानाकोपऱ्यावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ १५ आॅगस्टपासून होणार यंत्रणा कार्यान्वित

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. रेल्वेस्थानकावर यापूर्वी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे अत्याधुनिक २४० कॅमेरे रेल्वेस्थानकावर लावण्यात येत आहेत. यातील २०० कॅमेरे रेल्वेस्थानकाच्या कानाकोपऱ्यात लावले असून आगामी १५ आॅगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चेहरा (फेस रिकग्नाईज) ओळखणाऱ्या चार कॅमेऱ्यांचा समावेश आहे. यात एखाद्या गुन्हेगाराचा फोटो अपलोड केला आणि पुन्हा तो गुन्हेगार या कॅमेऱ्यासमोर आल्यास हा कॅमेरा आरपीएफच्या नियंत्रण कक्षात अलार्म देईल. त्यानुसार संबंधित गुन्हेगाराला पकडणे सहज शक्य होणार आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी १५० रेल्वेगाड्या आणि ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे येथे सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम ही अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी युक्त यंत्रणा बसविण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यावर्षी ही योजना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावर २४० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातील २०० कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. आगामी १५ दिवसात उर्वरित ४० कॅमेरे बसविण्यात येणार असून १५ आॅगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असा विश्वास रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर