शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 20:26 IST

विश्वासू म्हणून तीन वर्षांपासून काम करणाऱ्या एका आरोपीने ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना लावला.

ठळक मुद्देरक्कम उचलली, जमाच केली नाही : ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्वासू म्हणून तीन वर्षांपासून काम करणाऱ्या एका आरोपीने ट्रान्सपोर्टरला सव्वाचार लाखांचा चुना लावला. रवींद्र राजम कलवला (वय ४१) असे आरोपीचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा रहिवासी आहे.उमरेड मार्गावरील प्यारे खान जियाखान (वय ४३) हे ट्रान्सपोर्टर आहेत. त्यांच्याकडे आरोपी रवींद्र ट्रकचालक म्हणून १ मार्च २०१७ पासून कामाला होता. त्याला त्यासाठी ४५०० रुपये पगार दिला जात होता. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी माल पोहचवला तेथून मालाची रक्कम घेऊन येण्यापोटी ७०० रुपये मासिक कमिशन दिले जात होते. आरोपीने चंद्रपूरच्या जयस्वाल अ‍ॅन्ड कंपनीतून २९ जून ते १० ऑगस्ट २०१९ या कालावधीत ४ लाख २१ हजार ७०० रुपये तसेच १ लाख ९२ हजारांचा धनादेश घेतला. हा धनादेश त्याने प्यारे खान यांच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात जमा केला. मात्र, ४,२१,७०० रुपयांची रोकड जमा केली नाही. अनेक दिवसांपासून जयस्वाल यांच्याकडे ती रक्कम बाकी आहे, असा समज झाल्याने प्यारे खान यांच्याकडून जयस्वाल यांना विचारणा झाली. त्यानंतर रवींद्रचे बिंग फुटले. त्याने ही रक्कम चार महिन्यांपूर्वीच नेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्यारे खान यांनी रवींद्रला रकमेबाबत विचारणा केली. त्याने ती रक्कम खर्च केल्याचे सांगून आज देतो, उद्या देतो, असे म्हणत आतापर्यंत टाळाटाळ केली. काही दिवसांपासून मात्र त्याने रक्कम देण्यास नकार देऊन तुमच्याकडून जे होते, ते करून घ्या असे म्हटले. त्याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने प्यारेखान यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी