शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

राहुल गांधींच्या 'भारत जोडो' पदयात्रेवरील 'तो निघालाय....' या  कवितेचे १३ भाषांमध्ये भाषांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 18:06 IST

Nagpur News राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर लिहिलेली एक कविता सध्या देशविदेशात गाजत आहे.

ठळक मुद्देसॅम पित्रोदा यांनीही घेतली दखल हेरंबकुलकर्णी यांची कविता गाजतेय देशविदेशात

नागपूरः कन्याकुमारी ते काश्मीर असा पल्ला गाठणाऱ्या, जनसामान्यांच्या प्रश्नांची माहिती घेत निघालेल्या, तळागाळातील नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद करत चाललेल्या भारत जोडो यात्रेचे तसेच या यात्रेचे जनक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करणारी एक कविता सध्या राज्यभरातच नव्हे तर राज्य तसेच देशाबाहेरही चर्चेत आहे. या कवितेचे आतापर्यंत ११ भारतीय  भाषांमध्ये व २ विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही कविता लिहिली आहे. या कवितेचे ज्या भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले त्यात, अरबी भाषेत नौशाद अलदे (सौदी अरेबिया), स्वाती वैद्य-हिंदी, संजय सोनवणी-इंग्रजी, मिलिंद पाटील-कन्नड, पुजा पुरोहित-गुजराती, विनानंद गावंडे-चंदगडी मराठी, एकनाथ गोफणे-बंजारा गोरबोली, सतीश ललित- मालवणी, नितीन खंडाळे-अहिराणी, अरविंद शिंगाडे-वऱ्हाडी, काकासाहेब वाळूंजकर-नगरीबोली यांचा समावेश आहे.

सॅम पित्रोडा यांनी घेतली दखल

जेष्ठ दूरसंचार अभियंते, संशोधक, विकासकांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ सल्लागार सत्यनारायण गंगाराम पित्रोडा उर्फ सॅम पित्रोडा यांनी ट्विटरवर या कवितेची दखल घेतली आहे. आपल्या ट्विटमध्ये  त्यांनी राहुल गांधींवर लिहिलेल्या उपरोक्त कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे.  

हेरंब कुलकर्णी यांची कविता-

 

तो निघालाय

तो निघालायदक्षिणेकडून उत्तरेकडेउत्तर नसलेल्या प्रश्नांना स्पर्श करत विमान,जेट,हेलिकॉप्टर,बुलेटप्रूफ गाड्या,सारे हाताशी असतानाही धुळीच्या रस्त्यावरून  तो निघालाय....

गर्दीचा गैरफायदा घेतबापाच्या चिंधड्या झालेल्या प्रदेशातून पुन्हा त्याच गर्दीवर विश्वास टाकत हिंसेलाही लज्जित करत तो निघालाय..

पूर्वीही असेच राजे निघत अश्वमेध करायला, सैन्य घेऊनजिंकत जिंकतरक्ताचा सडा शिंपडत---पण तो नि:शस्त्र आहेप्रेम आणि संवादाचे शस्त्र घेऊन 

राज्य जिंकण्याचे सोडाच  निवडणूक जिंकण्याचीही गोष्ट तो बोलत नाहीपक्षाच्या सीमा ओलांडून समविचारींना कवेत घेत तो निघालाय

फक्त येईल त्याला प्रेमाने आलिंगन देत,एकट्या पडलेल्या व्यवस्थेत हरलेल्या फाटक्याकेविलवाण्या माणसांना मायेची ऊब देत तो निघालाय...

त्याच्या वयाला न शोभणारा ,घरातला प्रेमळ ज्येष्ठ माणूस आबालवृद्धांना त्याच्यात भेटतोयकुणाला भाऊ,कुणाला बाप, कुणाला लेक अशा नात्यात हा पन्नाशीचा पोरगा लुभावतोय....त्याला भेटून रडताहेत माणसं त्यांच्या अश्रूत वाहताहेत, व्यवस्थेने त्यांच्यावर केलेले शोषणाचे घाव

नुसते चालून  होईल काय ? लोकांशी बोलून होईल काय ?हा दांडी यात्रेपासून भूदान यात्रेपर्यंत आणि चंद्रशेखर ते बाबा आमटेपर्यंत खिल्ली उडवणारा ऐतिहासिक प्रश्न त्यालाही विचारला जाईल...पणअसल्या प्रश्नांची उत्तरे वर्तमाननाहीतरइतिहासच देत असतो... 

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी