शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नासुप्रच्या सर्व मालमत्ता हस्तांतरित करा : सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:26 IST

नासुप्रने विकासाच्या नावाखाली प्लॉटधारकांकडून मोठ्या प्रमाणात विकास शुल्क वसूल केले. परंतु प्रत्यक्षात या वस्त्यात रस्ते, पाणी, गडर लाईन व पथदिवे अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधी लागणार असल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील नासुप्रने ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित करताना शिल्लक निधी उपलब्ध करावा. हा निधी इतर कामावर खर्च करण्यात आला असेल तर फरकाचा निधी शासनाने उपलब्ध करावा, तसेच नासुप्रच्या सर्व मालमत्ता हस्तांतरणाच्या सूचनासह ८८९ ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांरित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्दे८८९ ले-आऊ ट हस्तांतरणाला सूचनासह मंजुरीले-आऊ ट हस्तांतरणासोबतच शासनाकडे निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नासुप्रने विकासाच्या नावाखाली प्लॉटधारकांकडून मोठ्या प्रमाणात विकास शुल्क वसूल केले. परंतु प्रत्यक्षात या वस्त्यात रस्ते, पाणी, गडर लाईन व पथदिवे अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधी लागणार असल्याने महापालिका कार्यक्षेत्रातील नासुप्रने ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित करताना शिल्लक निधी उपलब्ध करावा. हा निधी इतर कामावर खर्च करण्यात आला असेल तर फरकाचा निधी शासनाने उपलब्ध करावा, तसेच नासुप्रच्या सर्व मालमत्ता हस्तांतरणाच्या सूचनासह ८८९ ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांरित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.नगर रचना विभागाने मांडलेल्या नासुप्रचे ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावर सभागृहात वादळी चर्चा झाली. राज्य शासनाने डिसेंबर २०१७ पर्यंत नासुप्र बरखास्त करून महापालिकेकडे सर्व मालमत्ता हस्तांतरित करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याची आक्रमक भूमिका शिवसेनेसह विरोधकांनी घेतली. मात्र शासनाच्या घोषणेप्रमाणे नासुप्रची सर्व मालमत्ता व ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित होईल; सोबतच वसूल करण्यात आलेल्या विकास शुल्कातील शिल्लक निधी मिळेल. निधी शिल्लक नसल्यास फरकाची रक्कम राज्य शासनाकडून मिळेल, अशी ग्वाही सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली. सूचनांसह हा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याची सूचना त्यांनी केली. महापौर नंदा जिचकार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.विकासाच्या नावाखाली नासुप्रने प्लॉटधारकांकडून शुल्क वसूल केले; परंतु येथे अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नासुप्रकडून ले-आऊ ट हस्तांतरित झाल्यानंतरही बांधकामासाठी मंजुरी नासुप्रकडून घ्यावी लागते. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. याचा विचार करता ले-आऊ ट हस्तांरणासोबतच नासुप्रने शिल्लक निधी उपलब्ध करावा. तसेच नासुप्रच्या सर्व मालमत्ता हस्तांतरित करण्याची मागणी माजी महापौर प्रवीण दटके, काँग्रेसचे संदीप सहारे, मनोज सांगोळे, प्रफुल्ल गुडधे, शिवसेनेचे किशोर कुमेरिया, बसपाचे मोहम्मद जमाल आदींनी केली. अविनाश ठाकरे यांनी नासुप्रचे विकसित केले असतील तेच ले-आऊ ट हस्तांतरित करण्यात यावे, अशी भूमिका मांडली.नासुप्रने प्लॉटधारकांकडून प्रति चौरस फूट १६ रुपये, ६४ रुपये व ९० रुपये अशा स्वरूपात विकास शुल्क वसूल केले. परंतु या वस्त्यांत सुधारणा झालेली नाही. हा पैसा नासुप्रकडे जमा आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी मांडली. किशोर कुमेरिया म्हणाले, नासुप्र बरखास्त करण्याची शासनाने घोषणा केली, परंतु नासुप्र बरखास्त झाली नाही. नासुप्रच्या सरसकट सर्व मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित करा. शहरालगतच्या भागातील नागरिक नासुप्रमुळे त्रस्त आहेत. विकास शुल्काच्या नावाखाली नासुप्रने किती निधी जमा केला, याची महापालिकेकडे माहिती नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊ न हा प्रस्ताव आणावा, अशी सूचना मोहम्मद जमाल यांनी केली.शासनाने ५०० कोटी द्यावेशहरालगतच्या भागात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमांतर्गत ले-आऊ ट महापालिकेकडे हस्तांतरित झाले तर विकास कामे होतील. तसेच हस्तांतरणासोबतच या भागातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडे ५०० कोटींची मागणी करावी, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केली.विकास शुल्काची माहिती नाहीविकासाच्या नावाखाली नासुप्रने प्लॉटधारककडून विकास शुल्क वसूल केले. परंतु या भागात विकास कामे केली नाही. ले-आऊ ट हस्तांतरित झाल्यानंतर महापालिकेला विकास कामे करावयाची आहेत. त्यामुळे ले-आऊ ट ताब्यात घेताना नासुप्रने विकास शुल्काच्या स्वरूपात किती निधी जमा केला, खर्च किती झाला, महापालिकेला किती मिळणार, याची माहिती महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे असणे अपेक्षित होते. परंतु अशी माहिती उपलब्ध नसल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सभागृहात स्पष्ट केले.शुल्क वसूल केले, पण विकास नाहीवाठोडा वॉर्डात अनधिकृत ले-आऊ टमधील प्लॉटधारकांकडून नासुप्रने विकास शुल्क वसूल केले. परंतु या भागात कोणत्याही स्वरूपाची विकास कामे झाली नसल्याचे भाजपाचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी निदर्शनास आणले.व्यावसायिक मालमत्ता हस्तांतरित व्हाव्यातमहापालिका कार्यक्षेत्रातील नासुप्रच्या व्यावसायिक मालमत्ता आहेत. हा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. या मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यात मंगल कार्यालये, क्रीडांगणे, व्यावसायिक संकुल आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका