शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:23 IST

नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवारी नागपूर शहराच्या उत्तर व दक्षिण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

ठळक मुद्देशहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; अनेक भागात वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच पाणीपुरवठा योजनेसाठी नवेगाव खैरी येथे रोहित्रासाठी उभारण्यात आलेला चार खांबाचा चबुतरा मंगळवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने पेंच- ४ जलशुद्धीकरण कें द्राचा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवारी नागपूर शहराच्या उत्तर व दक्षिण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. वादळी वारे व पावसामुळे नागपूर शहरातील मानकापूर व अंबाझरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यत सुरळीत झाला नव्हता.मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास सावनेर,पारशिवनी परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता कि नवेगाव खैरी येथे महापालिकेचा पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या ४ खांबाचा चबुतरा जमीनदोस्त झाला. सोबतच नवेगाव खैरी परिसरास वीजपुरवठा करणारी वाहिनीही क्षतिग्रस्त झाली. नागपूर शहरातही वादळी वाºयासह पावसाच्या सरी आल्या. यामुळे मानकापूर व अंबाझरी भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यत काही वस्त्यातील वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.नवेगाव खैरी येथील चबुतरा कोसळल्याची माहिती मिळताच महावितरण सावनेरचे कार्यकारी अभियंता डी. एन. साळी यांनी तात्काळ येथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. नवेगाव खैरी ते मनसर या वाहिनीची लांबी सुमारे ३० किलोमीटर लांब असून जंगलातून जात असल्याने संध्याकाळी ५ नंतर वीज वाहिनीची तपासणी करून बिघाड दुरुस्त करणे पावसामुळे आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे कठीण झाले होते. तरी देखील महावितरणचे अधिकारी-कर्मचारी यांनी वाहिनीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मोहपा उपविभागातील बोहली,तेलकामठी, कन्हया डोल येथील वीज पुरवठा संध्याळकाच्या वेळी वादळी पावसामुळे खंडित झाला असून तो सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.उत्तर व दक्षिण नागपूरचा पाणीपुरवठा बाधितवादळामुळे रोहित्राचा चबुतरा कोसळल्याने पेंच प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे बुधवारी उत्तर व दक्षिण नागपुरातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. यात नारा जलकुंभ, नारी जलकुंभ, जरीपटका जलकुंभ, धंतोली जलकुंभ, श्री नगर डायरेक्ट टॅपिंग, नालंदा नगर जलकुंभ, ओंकार नगर जलकुंभ १ व २, म्हाळगी नगर जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ, मंगळवारी डायरेक्ट टॅपिंग, इंदोरा जलकुंभ, १० नं. पुलीया डायरेक्ट टॅपिंग व इंदोरा डायरेक्ट टॅपिंग.

टॅग्स :thunderstormवादळelectricityवीज