शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:31 IST

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असून आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे वेटिंगची स्थिती : हावडा-मुंबई रेल्वेगाडीत अधिक वेटिंग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असून आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने रेल्वे बोर्डाने वाहतूक सुरू केली. सुरुवातीला विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. यातील काही गाड्या नागपूरमार्गे धावत होत्या. यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली. कोरोनामुळे नागरिक अत्यावश्यक असल्यास प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या एसी फर्स्टमध्ये १७ सप्टेबरला वेटिंग १७, सेकंड एसीत वेटिंग २९, थर्ड एसीत वेटिंग ५० आणि स्लिपरमध्ये १९९ वेटिंग आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडात १९ सप्टेंबरला फर्र्स्ट एसीत वेटिंग ४, सेकंड एसीत वेटिंग २१, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ७९ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३४ हावडा-अहमदाबादमध्ये १९ सप्टेंबर रोजी सेकंड एसीत वेटिंग ९, थर्ड एसीत वेटिंग २८, स्लिपरमध्ये वेटिंग १०२ सुरू आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३३ अहमदाबाद-हावडामध्ये २१ सप्टेंबरला सेकंड एसीत वेटिंग १३, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ५७ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२७२३ हैदराबाद-नवी दिल्लीमध्ये फर्स्ट एसीत वेटिंग २, सेकंड एसीत वेटिंग २, थर्ड एसीत वेटिंग २ आणि स्लिपरमध्ये वेटिंग ८ सुरु आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२२९५ बंगळुर-पटनामध्ये सेकंड एसीत वेटिंग ३, थर्ड एसीत वेटिंग ११, स्लिपरमध्ये वेटिंग २४ आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२७९१ सिकंदराबाद-दानापूरमध्ये सेकंड एसीत वेटिंग ६, थर्ड एसीत वेटिंग ५, स्लिपरमध्ये वेटिंग २४ सुरु आहे. नागपूर मार्गे चारही दिशांना धावणाऱ्या रेल्वेगाड्यात पुढील महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.कन्फर्र्म तिकीटधारकांनाच प्रवेशरेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असली तरी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेपर्यंत तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे.रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसादरेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार नागपूरमार्गे जवळपास ३२ रेल्वेगाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी