शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:07 AM

पावसाळी अधिवेशन शुक्रवारी आटोपल्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देअधिवेशन आटोपल्यामुळे गर्दी : विदर्भ, सेवाग्राम, दुरांतोत वेटिंग २०० वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी अधिवेशन शुक्रवारी आटोपल्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केली. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या फुल्ल झाल्याचे चित्र होते.शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे अधिवेशन आटोपताच पोलीस, कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये एकच गर्दी केली. मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यात गर्दी होऊन त्या फुल्ल झाल्या होत्या. नेते, आमदार आणि कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विदर्भ एक्स्प्रेसने रवाना झाले. तर जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांनी दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास केला. यात प्रवाशांच्या सुविधेसाठी विदर्भ एक्स्प्रेसला एक एसी २ चा अतिरिक्त कोच जोडण्यात आला होता. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये जवळपास सर्वच कोचमध्ये १५० च्या वर वेटिंग पाहावयास मिळाली. सेवाग्राम एक्स्प्रेसमध्येही १७० च्या जवळपास वेटिंग असल्यामुळे या गाडीलाही रेल्वे प्रशासनाच्या वतीने एक एसी २ चा अतिरिक्त कोच जोडण्यात आला. दुरांतो एक्स्प्रेसच्या एसी २ कोचमध्ये १२० वेटिंग, एसी थ्रीमध्ये २०० आणि स्लिपरक्लासमध्ये १५० वेटिंगची स्थिती होती. अनेक जण वेटिंगचे तिकीट हातात पडल्यामुळे गाडी प्लॅटफार्मवर लागल्यानंतर बर्थ मिळविण्यासाठी टीसीशी संपर्क साधताना दिसले. तर बर्थ उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना विना बर्थ प्रवास करण्याची पाळी आली.नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त स्लिपर कोचप्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ११४०३/११४०४ नागपूर-कोल्हापूर (छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) एक्स्प्रेसमध्ये स्लिपर क्लास कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११४०३ नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये २१ जुलैला तर रेल्वेगाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये २३ जुलैला दोन स्लिपर क्लास कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त कोचचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी