नागपूर : चिंचभुवनजवळ दोन अवजड लोखंडाचे सामान असलेले ट्रेलर गेल्या आठ दिवसांपासून अडकून पडले आहे. यामुळे होणाऱ्या अपघाताची वाहतूकदाराला कुठलीही पर्वा नाही. यासंदर्भात संबंधित विभागही समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. या विभागांना नियमांची माहितीच नाही. हे ट्रेलर जेथे फसले आहेत त्याची जबाबदारी एनएचआय आणि बीडब्ल्यूडी एकमेकांवर ढकलते आहे. नागपूरच्या वर्धा मार्गावरील चिंचभुवन आरओबी धोकादायक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला फोरलेन मार्ग आहे पण पूल टू लेन आहे. वर्धा मार्गावर पूल संपतो तेथेच हे ट्रेलर थांबविण्यात आले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत या ट्रेलरला रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्यात आलेले नव्हते. रात्री ब्लिंकर (चालू बंद होणारा लाईट) ही सुरू ठेवण्यात येत नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची चिन्हे आहेत. विशेषत: हे ट्रेलर १ जुलै रोजी काढण्यात आले आणि परवानगी प्राप्त करण्याची प्रक्रिया ३ जुलैला प्रारंभ करण्यात आली. वाहतूकदार म्हणतो गेंट्री (शहराच्या जवळ असणारे साईन बोर्डचे गेट) केवळ १९ फूट उंच आहे. एनएचआयच्या म्हणण्याप्रमाणे गेंट्रीची उंची साडेपाच मीटर तर पीडब्ल्यूडीप्रमाणे ही उंची साडेचार मीटर असायला हवी. वाहतूकदाराचा दावा मात्र २२ फूट जवळपास साडेसात मीटर उंची पाहिजे, असा आहे. गेंट्री साडे चार मीटर उंच असतेनागपूर - वर्धा मार्गावरील जामठापर्यंतचा १४ कि. मी. रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पीडब्ल्युडीजवळ आहे. गेंट्री साडे चार मीटर उंचीची असते. आमच्या कार्यक्षेत्रात एकच गेंट्री येतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डहाके यांनी व्यक्त केले. वाहतूकदाराने यासंदर्भात पीडब्ल्यूडीशी संपर्क केलेला नाही. मंत्रालयाची परवानगी हवीनागपूर ते जामठा हा मार्ग पीडब्ल्युडीकडे आहे. ट्रकला नेण्यापूर्वी मंत्रालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. पण अशी परवानगीच घेण्यात न आल्याने या विषयाची कुठलीही सूचना मिळालेली नाही. वाहतूकदाराने दिली धमकीगाडीचे लोडींग करताना आरटीओकडून परवानगी घेतली. यासाठी २७ हजार रुपयांचा खर्च आला. यानंतर मंत्रालयाकडून परवानगी मिळवताना ३५ हजार रुपयांचा खर्च केला. पण यासंदर्भात बऱ्याच प्रकारची माहिती स्पष्टपणे देण्यात येत नसल्याने संध्याकाळी पून्हा वाहतूकदार सोनबीर सिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी धमकी द्यायला सुरुवात केली. फोनवर वाहतूकदाराने सोनबीर सिंह असे नाव सांगितले पण प्रत्येक फोनच्यावेळी आवाज बदलत होता.(प्रतिनिधी)
दोन विभागांच्या भांडणात अडकले ट्रेलर
By admin | Updated: July 9, 2015 03:03 IST