शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेचे पोलीस करताहेत रेकॉर्डिंग

By admin | Updated: September 20, 2016 02:34 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत

आरोप होऊ नये म्हणून खबरदारी : वाहनचालकांनो सावधान ! नागपूर : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलीस खाबुगिरीच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरत असल्याचे पाहून आरोप टाळण्यासाठी त्यांना आता मोबाईलने रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या आणि नंतर पोलिसांशी वाद घालणाऱ्या वाहनचालकाची रेकॉर्डिंग केली जात आहे. या सबळ पुराव्याच्या आधारे वाहनचालकावर कडक कारवाई होऊ शकते. वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईपेक्षा आरोपांमुळेच वर्षभर चर्चेत राहतात. पैसे दिले नाहीत म्हणून वाद घातला, कारवाई केली, मारहाण केली, खोटी तक्रार करून गुन्हा नोंदविला, असे हे आरोप असतात. अनेक प्रकरणात हे आरोप खरेही असतात. वाहनचालकाला थांबवल्यानंतर त्याचा खिसा हलका करण्याचाच वाहतूक शाखेच्या पोलिसांचा प्रयत्न असतो. वाहनचालकांशी सौजन्याने वागा ड्रंक न ड्राईव्हच्या बहुतांश प्रकरणात वाहनचालकासोबत पोलिसांची बाचाबाची होते. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी प्रकाश बारंगे नामक वाहतूक शाखेच्या हवालदारावर सूर्यकांत व्यास याने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली. पुन्हा एकदा वाहतूक शाखेच्या पोलिसांचा कारभार चर्चेला आला. तो लक्षात घेत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. वाहनचालकांशी वाद घालू नका, सौजन्याने वागा, असे सांगितले आहे. वाहनचालक वाद घालत असेल तर त्याचे मोबाईलने रेकॉर्डिंग करा. नंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल असेही उपायुक्त पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहतूक शाखेचे पोलीस चौकाचौकात कारवाई करतानाच मोबाईलने रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.