शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नागपुरातील वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:17 AM

मागील काही काळापासून नागपूर शहरातील प्रदूषण वाढीस लागले आहे. अशा स्थितीत कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांचा कसच लागतो. मात्र पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआवश्यक प्रमाणात ‘मास्क’, ‘जॅकेट्स’च नाहीत वाहतूक विभागाकडून खरेदीदेखील नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून नागपूर शहरातील प्रदूषण वाढीस लागले असून पारादेखील तापताना दिसून येत आहे. अशा स्थितीत कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांचा कसच लागतो. मात्र पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एकीकडे आधुनिकीकरणाचे मोठमोठे दावे करणाऱ्या विभागाकडून वाहतूक पोलिसांसाठी आवश्यक प्रमाणात ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’देखील खरेदी करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत सतत ऊन, प्रदूषण यांचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. वाहतूक पोलिसांसाठी विभागातर्फे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘मास्क’ खरेदी करण्यात आले आहेत का, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ‘जॅकेट्स’ घेतले आहेत का, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर शहरात सद्यस्थितीत पाचशेहून अधिक वाहतूक पोलीस आहेत. मात्र वाहतूक विभागाने दिलेली माहिती आश्चर्यचकित करणारी आहे. वाहतूक विभागाने पोलिसांसाठी ना ‘मास्क’ खरेदी केले ना ‘जॅकेट्स’ घेण्यासाठी पावले उचलली. १९ जानेवारी २०१८ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे वाहतूक विभागाला २५० ‘मास्क’ देण्यात आले होते. तर ४ मे २०१८ रोजी १०० ‘जॅकेट्स’ प्राप्त झाले होते. यांच्या भरवशावरच वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत आहेत. प्राप्त झालेले ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’ यांची संख्या पर्याप्त नसतानादेखील वाहतूक विभागाने खरेदीसाठी पावले उचलली नाहीत. नागपूर शहरातील अनेक चौकांमध्ये गर्दीच्या वेळी प्रदूषण वाढलेले असते. अशा स्थितीत वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा सामना करत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक विभागाला काहीच चिंता नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात झाले, नागपुरात का नाही ?वैद्यकीय सल्ल्यानंतर वाहतूक पोलिसांसाठी पुणे वाहतूक शाखेने ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’ची खरेदी केली होती. नागपुरात पुण्याहून जास्त ऊन तापते व शहरातील ‘पीएच २.५’, ‘पीएच १०’ या धुलीकणांचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. अशा स्थितीत नागपूरच्या वाहतूक पोलीस विभागाने कुठलाही पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस