शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरीतील वाहतूक कोंडी सुटणार, नागपुरात चार तासांसाठी VNITतून ट्रॅफिक वळवणार!

By योगेश पांडे | Updated: July 13, 2024 00:42 IST

दुचाकी, रुग्णवाहिकांना परवानगी; सोमवारपासून अंमलबजावणी; न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर प्रशासनाला जाग

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अंबाझरी येथे पुलाचे काम सुरू असल्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतुकीच्या दुरावस्थेवरून न्यायालयाने वाहतूक पोलीस उपायुक्तांची कानउघाडणी केल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे. व्हीएनआयटीच्या अंतर्गत मार्गातून दिवसातून चार तास वाहतूकीच्या आवागमनासाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी व सायंकाळी कार्यालयीन वेळांच्या दरम्यान दोन-दोन तास ही परवानगी असेल.

वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी रात्री जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ जुलै रोजी वाहतूक कोंडीसंदर्भात निर्देश दिले होते. जोपर्यंत सांडव्याच्या पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हीएनआयटीच्या आतील मार्गातून वाहतूक जाऊ द्यावी असे त्यात स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार हिंगण्याकडून येणारी व गजानन टी पॉईंटकडून सिताबर्डीकडे जाणारी वाहने इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपासमोरून व्हीएनआयटीने तयार केलेल्या तात्पुरत्या मार्गाने जातील व व्हीएनआयटीच्या प्रवेशद्वार क्रमांक तीन यशवंत नगर चौकात निघतील. या मार्गाने केवळ दुचाकी व रुग्णवाहिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत ही परवानगी असेल असे सातव यांनी या अधिसूचनेतून स्पष्ट केले आहे. ही परवानगी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या महिन्याभरासाठी देण्यात आली आहे. कामाचे स्वरूप पाहता पुढे त्यात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी