शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नागपुरात निघाली मारबत आणि बडग्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:52 IST

रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली.

ठळक मुद्देकाळ्या मारबतीला १३७ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. शहराच्या जुन्या वस्तीत असलेल्या महाल परिसरातून ही मिरवणूक दरवर्षी निघत असते.काय आहे मारबत आणि बडग्या? 

मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाचीतान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत.बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात.या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी)नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात.मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.ही एक प्रकारे जत्राच आहे. तेथे अनेक फेरीवाले फुगे,खेळणी इ.वस्तु विकतात.या वेळेस पावसाळयाच्या जोर कमी झाला असतो.शेतीची कामेपण बहुदा झालेली असतात.त्यामुळे शेतकऱ्यांना व इतरेजनांना हा एक विरंगुळा वाटतो. ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकर आणि या परीसरातील नागरीकांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे.

काळ्या मारबतीला १३७ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३३ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघत असतात. ब्रिटिश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. परकीय गुलामगिरीचे पाश तुटून देश स्वतंत्र व्हावा, या भावनेने १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक