शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात व्यापाऱ्याचे साडेआठ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 20:35 IST

जुने बसस्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अगदी प्रवेशद्वारावर एका तरुण व्यापाऱ्यास गंभीर जखमी करीत चार जणांनी बॅगमधील रोकड जबरीने हिसकावून पोबारा केला.

ठळक मुद्देउमरेडच्या युनियन बँकेसमोरील घटना : चाकूने भोसकले आणि पळ काढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : जुने बसस्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अगदी प्रवेशद्वारावर एका तरुण व्यापाऱ्यास गंभीर जखमी करीत चार जणांनी बॅगमधील रोकड जबरीने हिसकावून पोबारा केला. सुमारे साडेआठ लाख रुपयांची रक्कम आणि काही रकमेचे धनादेश या बॅगमध्ये होते. सोमवारी (दि.१४) सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास भरदिवसा घडलेल्या थरारक घटनाक्रमामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. निकेश महेश तोलानी (३०, रा. सिंधी कॉलनी, उमरेड) असे जखमी झालेल्या तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे. 

उमरेड मंगळवारी पेठ येथे पूजा एजन्सी या नावाने तोलानी यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी निकेश आपल्या बॅगमध्ये दुकानाची रोकड घेऊन काही अंतरावरच असलेल्या युनियन बँकेच्या स्थानिक शाखेकडे दुचाकीने निघाला. सदर बँक ही पहिल्या माळ्यावर आहे. यामुळे रस्त्यालगत वाहन लावून निकेश बॅगेत भरलेली रोकड घेऊन बँकेच्या दिशेने निघाला. 
अशातच प्रवेशद्वारावर आधीच दडून बसलेल्या एका चोरट्याने निकेशला अडविले. त्यानंतर लागलीच दोघांनी मागून येत निकेशला मारहाण केली. बॅग हिसकावण्यासाठी चांगलीच रस्सीखेच झाली. अशातच आणखी चौथ्या चोरट्याने येत धारदार शस्त्राने निकेशवर हल्ला केला. बळजबरीने बॅग हिसकावून चारही चोरटे एकाच दुचाकीवर इतवारी मुख्य मार्गाने पळाले. दुसरीकडे रक्तबंबाळ झालेला निकेश लगतच्याच किराणा दुकानात शिरला. केवळ १० सेकंदाच्या आतच हा थरार घडला. चारही चोरट्यांनी बॅगमध्ये असलेली रोकड पळविली. लागलीच निकेशला एका खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे रवाना करण्यात आले. निकेशची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. एका दुचाकीवर चार जण बसून जात असल्याचे तसेच मारहाणीचे चित्रण पोलिसांना गवसले असून, पुढील तपास सुरू आहे.नाकाबंदी केली पण...१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० वाजताच्या सुमारास युनियन बँकेच्या प्रवेशद्वारालगत घडलेल्या या प्रकारानंतर काही सेकंदातच चारही चोरटे इतवारी मुख्य मार्गाच्या दिशेने निघाले. लागलीच पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी नाकांबदी केली. परंतु त्याआधीच चोरटे पसार झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी