शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

मनपाच्या मनमानी विरोधात बुधवारी व्यापाऱ्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:57 IST

महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे आर्थिक संकटात असताना, दररोज नवीन आदेशाचा बोजा सहन करणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासनाच्या मनमानीमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. पहिले लॉकडाऊन नंतर अनलॉकमुळे व्यापारी प्रभावित झाला आहे. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या व्यापाऱ्यांवर मनपा प्रशासनाद्वारे दररोज नवनवीन आदेश लादले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनपाच्या विरोधात १९ ऑगस्ट रोजी सांकेतिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.यासंदर्भात सोमवारी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) व नागपूर शहरातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लि. (एनसीसीएल) ने आपापल्या कार्यालयात आपात्कालीन बैठक बोलाविली. बैठकीला शहरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही व्यापारी संस्थांनी १९ ऑगस्ट रोजी नागपूर बंदची घोषणा केली. बंदचा उद्देश पालकमंत्री, मनपा प्रशासन, महापौर, सत्तापक्ष व विरोधी पक्ष नेत्यांचे व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून, त्या मंजूर करण्यासाठी दबाव बनविण्याचा प्रयत्न आहे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया व एनसीसीएलचे अध्यक्ष विष्णूकुमार पचेरीवाला लोकमतशी बोलताना म्हणाले की, लॉकडाऊन व अनलॉकमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था कमकुवत झाली आहे. अशातही प्रशासनाला कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करीत आहोत. तरीही मनपा प्रशासन दररोज नवीन आदेश व्यापाऱ्यांवर लादत आहे.इतर शहरांमध्ये ऑड-ईव्हन डे पॅटर्नने बाजार सुरू करण्याचे आदेश निरस्त झाले आहेत. पण नागपुरात कायम आहे. त्याचबरोबर मनपा आयुक्तांनी शहरात व्यापार करण्यासाठी ट्रेड लायसन्स घेण्याचा आदेश जाही केला आहे. यामुळे इन्स्पेक्टर राज वाढेल व व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्याचबरोबर व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य करण्याच्या आदेशामुळे अडचणी वाढणार आहे. आर्थिक संकटामुळे त्रस्त झालेला व्यापारी दररोज नवीन आदेशाचा बोज सहन करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात येणार आहे. आदेश रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे.महापौर व पालकमंत्र्यांना दिले निवेदनएनव्हीसीसीच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले. सोबतच आयुक्तांनी ट्रेड लायसन्स आदेश रद्द करण्याची विनंती केली. तर एनव्हीसीसी व एनसीसीएलच्या शिष्टमंडळाने महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन मनपाच्या सभेत व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधावे, अशी विनंती केली.काय आहेत मुख्य मागण्याशहरात ऑड-ईव्हन डे पॅटर्न बंद करावा.मनपा आयुक्तांनी काढलेला ट्रेड लायसन्सचा आदेश रद्द करावा.व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्टचा आदेश मागे घ्यावा.

टॅग्स :Strikeसंपbusinessव्यवसाय