शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचार वाढले; ग्रामीण भागात वाईट परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात महिलांच्या दुरवस्थेवर खंत व्यक्त केली.

ठळक मुद्देहायकोर्टाने व्यक्त केली खंत

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात महिलांच्या दुरवस्थेवर खंत व्यक्त केली. आपण महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो, पण महिलांवरील अत्याचार अद्याप थांबले नाहीत. महिलांवर आजही विविध प्रकारचे अत्याचार होत आहेत. विशेषत: ग्रामीण महिलांची अवस्था चांगली नसून त्यांच्याबाबत दु:ख वाटते, अशा भावना न्यायालयाने व्यक्त केल्या.या प्रकरणात सरकार पक्षाला पती व सासऱ्याविरुद्ध विवाहितेच्या खुनाचा गुन्हा सिद्ध करता आला नाही. त्यामुळे व्यथित होऊन न्यायालयाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली व न्यायालयासाठी कायदेशीर पुराव्यांचे किती महत्त्व असते, हे देखील अधोरेखित केले. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे आम्ही केवळ कायदेशीर पुराव्यांच्या आधारेच हाताळू शकतो. हे आणखी एक असे प्रकरण आहे ज्यामध्ये आम्ही मयत महिलेला न्याय देण्यास असमर्थ आहोत. परंतु, आमचा नैसर्गिक कायद्यावर विश्वास आहे व तो कायदा आपल्या पद्धतीने कार्य करेल, असे न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला. रोमनलाल बेनीराम नागपुरे (३५) व बेनीराम राधेलाल नागपुरे (६५) अशी आरोपींची नावे असून, ते सालेकसा, जि. गोंदिया येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव कमलाबाई होते. सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला नाही. त्यामुळे आरोपींना संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्यात आले. आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

असे आहे प्रकरणकमलाबाई व रोमनलालचे १६ एप्रिल २००८ रोजी लग्न झाले होते. त्यांचे एकमेकांसोबत पटले नाही. त्यामुळे कमलाबाई माहेरी निघून गेली होती. त्यानंतर आपसी सहमतीने वाद मिटल्यामुळे कमलाबाई सासरी परत आली. दरम्यान, २४ डिसेंबर २०१३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपींनी तिचा गळा दाबून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

टॅग्स :Molestationविनयभंग