शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या दिवसांत नागपुरातील रेशन दुकानातून तूरडाळ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 22:43 IST

रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.दोन वर्षापूर्वी राज्यात तूरडाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे रेशन दुकानातून नागरिकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागपूर शहरात ६६५ रेशन दुकाने असून, लाखावर कार्डधारक आहेत. शहराला महिन्याला ६६७ मेट्रिक टन तूरडाळीची गरज आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात शासनाकडून निम्यापेक्षाही कमी पुरवठा झाला. नंतर मात्र तुरडाळीचा पुरवठा हळूहळू कमी करण्यात आला. तूरडाळीसाठी विचारणा केली असता शासनाकडूनच डाळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येत होते. सध्या तूरडाळ नव्वदीच्या घरात आहे. गरिबांना ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने रेशन कार्डधारक रेशन दुकानाकडे धाव घेत आहे. परंतु रेशन दुकानात डाळीचा पुरवठा नसल्याने त्यांना परतावे लागत आहे. ग्रामीण भागात तूरडाळीचा पुरवठा नियमित होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.अन्न व नागरी पुरवठा कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील रेशन दुकानांना तूरडाळीचा पुरवठा शासनाने बंद केला आहे. रेशनकार्डधारकांना तूरडाळ उपलब्ध होणार नाही.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर