शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ प्राधिकरणांतील सूर : राज्यपालांनी घ्यावा परीक्षांबाबत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 19:08 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयासंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. परीक्षांचा निर्णय हा कुलपती म्हणजेच राज्यपालांचा आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे राज्यपालांनी परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विधिसभा सदस्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा निर्णय विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयासंदर्भात शिक्षण वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. परीक्षांचा निर्णय हा कुलपती म्हणजेच राज्यपालांचा आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे राज्यपालांनी परीक्षांबाबत निर्णय घ्यावा, असे मत विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विधिसभा सदस्यांनी व्यक्त केले.व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. विद्यापीठाची व उच्चशिक्षणाची गुणवत्ता परीक्षेवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. विद्यापीठ कायदा-२०१६ नुसार परीक्षांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरू व कुलपतींना आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देण्यात येतील. तसेच ज्यांना श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांना पुढील सत्रात परीक्षा देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. म्हणजे काही विद्यार्थ्यांना श्रेणी व काहींना गुण मिळतील. एकाच अभ्यासक्रमातील दोन उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या गुणपत्रिका असतील. एकाकडे गुणांवर आधारित तर दुसऱ्याकडे श्रेणीआधारित गुणपत्रिका असेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण व रोजगाराच्या ठिकाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यपालांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी विष्णू चांगदे यांनी केली आहे.उशिरा घ्या, पण परीक्षा होऊ द्याव्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांनीदेखील राज्यपालांना पत्र पाठविले आहे. स्थिती नियंत्रणात आल्यानंतर परीक्षा घेतली पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या विविध पर्यायांचा वापर करत परीक्षा होऊ शकतात. राज्यपालांनी शिक्षणतज्ज्ञांची चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी शेराम यांनी केली आहे.सर्वांना सोबत घेऊन निर्णय व्हावाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्य शासनाने परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे जो काही अंतिम निर्णय होईल तो सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन व्हावा, असे मत विधिसभा सदस्य अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी व्यक्त केले.परीक्षांचा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का?कोरोना संकटामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याचा विरोध केला आहे. मुळात मुख्यमंत्र्यांची ही भूमिका विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर घाला घालणारी आहे. परीक्षांचा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे का, असा प्रश्न अभाविपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देण्यात येतील. तसेच ज्यांना ग्रेडमध्ये सुधारणा करायची आहे त्यांना पुढील सत्रात परीक्षा देता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. विद्यापीठ कायद्यानुसार असा निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही व तो टिकणारादेखील नाही. पुनश्च हरिओम म्हणताना मुख्यमंत्र्यांनी शाळा-महाविद्यालयातील शिक्षण सुरू व्हावे असे सांगितले. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा त्यांचा निर्णय न पटणारा आहे, असे मत अभाविपचे विदर्भ प्रदेश मंत्री रवी दांडगे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी