शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी उधारीवर ‘टॉयलेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 04:46 IST

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे काही उमेदवारांनी शेजा-याचे शौचालय उधारीवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

- राम वाघमारे नांद (नागपूर) : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे काही उमेदवारांनी शेजा-याचे शौचालय उधारीवर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणुकीपुरता सुरू असलेला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार की, हे अर्ज छाननीत बाद होणार, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात ग्रा.पं. निवडणूक लढवू इच्छिणाºया काही उमेदवारांच्या घरी शौचालय (टॉयलेट) नसल्याने अशांनी आता उसनवारीत शौचालय घेण्याची शक्कल लढविली आहे. शौचालय नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द होऊ नये, यासाठी तालुक्यातील काही जण चक्क शेजाºयांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवत आहेत.तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम सुरू आहेत. यातही सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. बºयाच जणांकडे शौचालये नाहीत. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना कागदोपत्री सुमारे १४ अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये शौचालय ही एक अट आहे. सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाºया ज्या उमेदवारांकडे शौचालय नाही, अशांनी शेजाºयांकडे असणाºया शौचालयाची उसनवारी करून निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.>ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सद्य:स्थितीत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रि या सुरू आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत हे काम चालेल. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक आयोगाच्या निकषात न बसणारे अर्ज रद्द केले जातील.- डी.जी. जाधव, तहसीलदार भिवापूर