भाजपचे आवाहन : सोमवारी क्वॉर्टरमध्ये रॅली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा एक नवा रोड मॅप सादर केला आहे. मोदी व गडकरी यांच्यात देशाचा विकास करण्याची क्षमता आहे. या नेत्यांना बळ देण्यासाठी व त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्यासाठी दक्षिणमध्ये भाजपला साथ द्या, असे आवाहन दक्षिण नागपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केले. कोहळे यांनी सोमवारी क्वॉर्टर परिसरात रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी कोहळे यांचे स्वागत केले. या वेळी नागरिकांच्या समस्या कोहळे यांनी जाणून घेतल्या. यावेळी कोहळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यासोबतच आता राज्यात कमळ फुलवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, दक्षिण नागपूर मंडळाचे अध्यक्ष कैलाश चुटे, भाजपाचे प्रदेश सदस्य बळवंत जिचकार, नगरसेवक रमेश सिंगारे, नगरसेविका निताताई ठाकरे, नगरसेवक सतीश होले, नगरसेविका रिता मुळे, दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, दक्षिण नागपूर महामंत्री विजय आसोले, संजय ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
मोदींसाठी दक्षिणमध्ये साथ द्या
By admin | Updated: October 8, 2014 00:48 IST