आज रोज डे : गुलाब द्या.. गुलाब घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 10:45 AM2019-02-07T10:45:58+5:302019-02-07T13:13:12+5:30

मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा होतो व तरुणाई वर्षभर याची चातकासाठी प्रतीक्षा करत असते.

Today Rose Day: Give Roses .. accept Roses .. | आज रोज डे : गुलाब द्या.. गुलाब घ्या..

आज रोज डे : गुलाब द्या.. गुलाब घ्या..

googlenewsNext
ठळक मुद्दे‘व्हॅलेन्टाईन वीक’साठी ‘यंगिस्तान’ सज्जपिवळे गुलाब- मित्र-मैत्रिणींसाठीनारिंगी गुलाब- ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिच्यासाठी..पांढरे गुलाब-ज्या व्यक्तीला सॉरी म्हणायचे आहे तिच्यासाठीलाल गुलाब- प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा होतो व तरुणाई वर्षभर याची चातकासाठी प्रतीक्षा करत असते. प्रेमदिवसाला अजून आठवडाभराचा अवधी असला तरी गुरुवारपासूनचे दिवस हे प्रेमानेच भारलेले राहणार आहेत. जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेन्टाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे.
‘व्हॅलेन्टाईन वीक’चा पहिला मान हा प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबालाच आहे. गुरुवार हा जगभरात ‘रोज डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. प्रेमाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तरुणाई आपल्या जिवलगांवर लाल-पिवळ्या गुलाबांची उधळण करणार आहे. तसे पाहिले तर ‘व्हॅलेन्टाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड. मग ते आईवडिलांपासून बहीण-भावंडे, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेले असो, प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, मनाच्या प्रीतीपाकळ्या अलगदपणे उलगडत जात असताना त्या चुरगळल्या जाणार नाहीत, याचा विश्वास पक्का व्हायला हवा. आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत.

असा असेल
‘व्हॅलेन्टाईन वीक’
७ फेब्रुवारी - रोज डे
८ फेब्रुवारी - प्रपोज डे
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
१० फेब्रुवारी - टेडी डे
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी - किस डे
१३ फेब्रुवारी - हग डे
१४ फेब्रुवारी - व्हॅलेन्टाईन डे

Web Title: Today Rose Day: Give Roses .. accept Roses ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.