शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

आज ऋषिकेश असता तर...;  अश्रूंनी भिजलेला अपूर्ण निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 10:17 IST

अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला.

ठळक मुद्दे २५ दिवसांपूर्वी काळाचा आघात

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लहानपणापासून त्याचे एकच स्वप्न...‘एरोनॉटिकल इंजिनिअर’ बनून त्याला आयुष्याच्या अवकाशात उंच कर्तृत्वझेप घ्यायची होती. अभ्यासात हुशार आणि खेळातही ‘ग्रॅन्डमास्टर’. बुद्धिबळाच्या पटावर तर तो स्वत:च ‘वजीर’ बनून उतरायचा. मात्र ‘कूलर’च्या माध्यमातून त्याचा काळ आल अन् आयुष्याच्या डावात नियतीने त्याचा घात केला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. विद्यार्थ्यांसाठी निकाल एक टप्पा पूर्ण करून नवीन सुरुवात घेऊन येतो. मात्र ७३ टक्के गुण प्राप्त करूनदेखील त्याचा हा निकाल मात्र एक ‘अधुरी’ कहाणीच ठरला. महाल येथील ऋषिकेश आमले याचा निकाल एका क्षणासाठी घरच्यांच्या वेदनांवर फुंकर घालून गेला. मात्र दु:खाचा पहाडच कोसळला असल्यामुळे त्याचा निकाल हा वेदनादायी अश्रूंनी भिजणाराच ठरला. सर्वांसाठी हा एक मोठा धक्काच होता. सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषिकेश बारावीची परीक्षा दिल्यानंतर ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या तयारीला लागला होता.विशेष म्हणजे त्याने ‘जेईई-मेन्स’ ही परीक्षादेखील ‘क्रॅक’ केली होती. क्रिकेटची तर त्याला विशेष आवड होती व बुद्धिबळाचा तो राज्यपातळीवरील खेळाडू होता. बारावीनंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू होता. मात्र कूलरमध्ये पाणी भरताना ‘शॉक’ लागला आणि सर्वांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.

निकाल लागला अन् भावनांचा बांध फुटलानिकालाच्या दिवशी आमले कुटुंबीय सकाळपासूनच काहीसे अस्वस्थ होते. शेतकरी असलेले वडील रामराव, आई शोभा, ‘आयटी इंजिनिअर’ असलेल्या नम्रता व अमृता या बहिणी यांच्यासाठी हा परीक्षेचाच काळ आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी निकाल जाहीर झाला आणि सर्वांच्याच भावनांचा बांध फुटला. आमच्या ऋषीची स्वप्ने मोठी होती आणि त्यांची पूर्तता करण्याची क्षमता आणि विश्वास त्याच्यात होता. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा ऋषी आज असता तर...असे बोलताना बहीण नम्रता हिच्या मनातील कालवाकालव बरेच काही सांगून गेली.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल