शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपुरातील टेकडी उड्डाणपूल पाडण्यावर आज शिक्कामोर्तब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:11 IST

गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक व ओपीडी असलेल्या रुग्णालयांना नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या मुद्यावर ३ नोव्हेंबरला विशेष सभा होणार होती. परंतु अचानक ही सभा रद्द करण्यात आल्याने पाणीटंचाईच्या मुद्यावर वादळी चचां होणार आहे.

ठळक मुद्देमनपा सभागृहात प्रस्ताव : ओपीडी शुल्क वाढणार : पाणीटंचाईवर वादळी चर्चा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेश टेकडी उड्डाणपूल तोडून सहापदरी मार्ग बनविण्यात येणार आहे. महामेट्रो हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभागृहात ठेवला जाणार आहे. उड्डाणपूल पाडण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच शहरातील क्लिनिक व ओपीडी असलेल्या रुग्णालयांना नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या मुद्यावर ३ नोव्हेंबरला विशेष सभा होणार होती. परंतु अचानक ही सभा रद्द करण्यात आल्याने पाणीटंचाईच्या मुद्यावर वादळी चचां होणार आहे.२९ सप्टेंबर २०१८ रोजी सभागृहात गणेश टेकडी उड्डाणपूल तोडण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. यावेळी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी विरोध दर्शविला होता. परंतु हा प्रस्ताव बहुमताने पारित करण्यात आला होता. महामेट्रोने उड्डाणपुलाचा तांत्रिक अहवाल दिला आहे. प्रशासनाने तो मान्य केला आहे. महामेट्रो उड्डाणपुलाखालील दुकानदारांचे पुनर्वसन करणार आहे. येथील १७४ पैकी १६४ दुकानदारांना परवाना दिलेला आहे. महामेट्रो जयस्तंभ चौक ते मानस चौक दरम्यान सहापदरी मार्गाचे निर्माण करणार असून उड्डाणपूल तोडण्याचे व दुकानदारांच्या पुनर्वसनाचे काम त्यांच्याकडेच देण्यात आले आहे. प्रस्ताव सभागृहात ठेवलेला नाही. पुढील सभागृहात ठेवला जाईल, अशी ग्वाही सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी दिली होती.रुग्णालय नोंदणी शुल्कात वाढशहरातील क्लिनिक व ओपीडी असलेल्या रुग्णालयांना महापालिकेकडे नोंदणीसाठी वार्षिक शुल्क आकारले जाते. सुधारित शुल्कानुसार जनरल ओपीडी दोन हजार रुपये, मल्टी स्पेशालिटी ओपीडी चार हजार, नेत्र व दंत चिकि त्सालयासाठी चार हजार, धर्मार्थ दवाखान्यासाठी एक हजार, पॅथॉलॉजीसाठी चार हजार तर रक्तपेढीसाठी दोन हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईवर विरोधक आक्रमकशहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने शहराच्या आरक्षित पाणीसाठ्यात कपात करण्यात आली आहे. सिंचन विभागाने कोच्छी येथील बंधाऱ्यात पाणी अडविल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्णक्षमतेने पाणी मिळण्याची शक्यता नाही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात नागपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु जलप्रदाय समिती व विभागाने अजूनही बोरवेलच्या कामांना सुरुवात केलेली नाही. शहरातील सार्वजनिक विहिरींचा वापर करण्यासाठी नियोजन केलेले नाही. यामुळे सभागृहात आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर