शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आज वर्धापन दिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:23 IST

कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविशेष बुध्दवंदना व धम्मदेसना : जपान येथील भिक्षु संघाची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर मंगळवारी १२ नोव्हेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २० व्या वर्धापन दिनाचा सोहळा होत आहे. या निमित्त ओगावा सोसायटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता जपान येथील प्रमुख विविध बुध्द विहारातील प्रमुख भदंत व भिक्षुसंघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना होईल. अध्यक्षस्थानी जपानमधील जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय निचिरेन-शु फेलोशिप असोसिएशनचे प्रमुख भदंत कानसेन मोचिदा राहतील. जपान येथील प्रमुख विविध २८ बुद्ध विहारातील प्रमुख भदंत व भीक्षु संघ तसेच जपान येथील बौध्द प्रतिनिधीसुध्दा उपस्थित राहणार आहेत.येथील कॅम्पसमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. विपश्यना मेडिटेशन केंद्रात नियमित ३ व १० दिवसांचे शिबिर घेतले जाते. दर पौर्णिमेला एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्रामध्ये वर्षभर अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल, तसेच दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्रही सेवेत आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा समावेश दीक्षाभूमी, चिचोली येथील शांतिवन सोबत बुध्दिष्ट टुरिस्ट सर्किटमध्ये करण्यात आला आहे.ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या दानदात्या नोरिको ओगावा यांना या कार्यक्रमात अभिवादन केले जाणार आहे. या समारंभासाठी जपान येथील भिक्षु संघाचे ११ नोव्हेंबरला आगमन झाले आहे.

टॅग्स :Dragon Palace Templeड्रॅगन पॅलेस मंदिरnagpurनागपूर