शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खर्रा खाणाऱ्यास कोरोना झाल्यास अधिक भयावह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 10:58 IST

खर्रा, तंबाखू, पान, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देखर्रा थुंकणाऱ्यांवर कारवाई व्हावीपानठेलेही बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थुंकी व शिंकण्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. नागपुरात रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खर्रा, तंबाखू, पान, गुटखा खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.राज्याच्या या उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर पानठेले आहेत. त्याचबरोबर या शहरात खर्रा, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. पान मसाले, गुटखा यांवर सरकारने बंदी घातली असली तरी बहुतांश पानठेल्यावर गुटखा, पान मसाले सर्रास मिळतात. सध्या कोरोनामुळे समाजातील सर्वच स्तरात काळजी घेतली जात असताना गुटखाबहाद्दरांचा हा शौक नागपूरकरांचा जीवावर उठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हे गुटखाबहाद्दर खर्रा, पान, तंबाखू खाऊन रस्त्यात कुठेही थुंकतात अशावेळी या पैकी एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनाचे विषाणू सर्वत्र पसरण्याची भीती आहे. महापालिकेने तसेच संबंधित यंत्रणांनी वेळीच या प्रकाराची दखल घेऊन या गुटखाबहाद्दरांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.खर्रा, पान खाऊ न थुंकणाऱ्यांवर कारवाईमहापालिकेला सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. रस्त्यावर थुंकून घाण करणाºयांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे लोकांच्या आरोग्याला घातक आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मागील १३ दिवसात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी थुंकणाऱ्या १३७ जणांना दंड आकारण्यात आला. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करू नये.- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) महापालिका

पानटपऱ्या बंद करणे अशक्यशाळा व महाविद्यालय बंद करण्याच्या आदेशाप्रमाणे पानटपऱ्या बंद करण्याचे वरिष्ठांकडून आदेश नाहीत. शिवाय कायद्यानुसार पानटपऱ्या बंद करता येत नाही. प्रतिबंधित तंबाखू, सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आणि दंड आकारण्याचे विभागाला अधिकार आहे. अनेक ठिकाणी पानाची विक्री होते. बंद करणे शक्य नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. लोकांनी रस्त्यांवर थुंकू नये.- शरद कोलते, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस