शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

उपराजधानीत राजरोसपणे विकला जातोय तंबाखू व खर्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:05 AM

राज्यात प्रतिबंधित तंबाखूचे उत्पादन होत नसले तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाचा वचक नाही अन्य राज्यातून आवकीवर नियंत्रण नाही

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाईच्या नावाखाली महिन्यात एक वा दोनदा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर धाडी टाकतात. राज्यात प्रतिबंधित तंबाखूचे उत्पादन होत नसले तरीही लगतच्या राज्यातून नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या तंबाखूची अवैध वाहतूक होते. तंबाखूची विक्री करणाऱ्यांना कुणाचा पाठिंबा आहे, हा आर्थिक व्यवहार समजण्यापलीकडे आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करीत असून नागपुरातील गोरखधंदा विभागाच्या नाकावर टिच्चून होत असल्याची माहिती आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून आता हे लोण लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली असली तरी, योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा ‘फज्जा’ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई करावीविभागाने पानटपऱ्यांसह लाखो रुपयांच्या तंबाखूचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या विक्रेत्यांवर धाडी टाकाव्यात. तंबाखू वितरणाचे मोठे स्रोत बंद करावेत. त्यामुळे पानटपरी चालकांना तंबाखूच मिळणार नाही. कमी स्टॉफ असण्याचा कारणांवरून अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाबाहेरच निघत नाही. शिवाय माहितीच्या आधारे बाहेर पडले तर केवळ बोटावर मोजण्याइतपत पानटपऱ्यांवर कारवाई करून मोकळे होतात. ही विभागाची नित्याचीच बाबत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पानटपरीचालकांना धाक नाहीविभागातर्फे नियमित कारवाया होत नसल्यामुळे प्रतिबंधित तंबाखूयुक्त खर्ऱ्याची विक्री करणाऱ्या पानटपरीचालकांना अधिकाऱ्यांचा धाक उरला नाही. कारवाईची माहिती होताच चालक टपरी बंद करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काहीही लागत नाही. केवळ दंडात्मक कारवाई नव्हे तर युवकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या टपरीचालकांकडून हजारांनी दंड वसूल करण्याची गरज आहे, तरच तंबाखूच्या विक्रीवर काही प्रमाणात आळा बसेल. वर्षापूर्वी वरिष्ठांच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी टपरीला सील लावण्याच्या कठोर कारवाईनंतर पानटपरी चालकांमध्ये दहशत पसरली होती. अनेकांनी पानटपऱ्या बऱ्याच दिवसांपर्यंत उघडल्या नव्हत्या. कारवाईनंतर थोडासा दंड आकारण्यापलीकडे विभाग काहीच करीत नसल्यामुळे पानटपरीचालकांमध्ये अधिकाऱ्यांचा धाकच उरला नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. सन २०१९ मध्ये केवळ माहितीच्या आधारे दुकानदारांकडून प्रतिबंधिक तंबाखू जप्त करण्याशिवाय नागपुरातील हजारो पानटपऱ्यांवर कारवाईच केली नसल्याची माहिती आहे.

तंबाखूमध्ये अतिविषारी रसायनेतंबाखू आणि तंबाखूच्या धुरात अतिविषारी रसायने सापडतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटिनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते. भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती तंबाखूचे सेवन अथवा धूम्रपान करतो.

दररोज खºर्याचा लाखोंचा व्यवसायप्रतिबंधित तंबाखू बिनादिक्कत नागपुरात मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो आणि गोदामांमध्ये साठविला जातो. तसेच विशिष्ट विक्रेत्यांच्या माध्यमातून पानटपरीवर वितरित होतो. नागपुरात गल्लोगल्ली आणि चौकाचौकात तीन हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्या सुरू असून त्यावर सुगंधित तंबाखूयुक्त खर्ऱ्याची सर्रास विक्री होत असल्याचे लोकमत प्रतिनिधीला पाहणीदरम्यान आढळून आले. काही पानटपऱ्या हॉस्पिटललगत आणि लोकवस्तीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय असो वा विभागीय कार्यालय सर्वच शासकीय कार्यालयांच्या परिसरात खर्रा विकला जातो. धंतोली, महाल, रेशीमबाग, मानेवाडा, इतवारी, गांधीबाग बाजारपेठेत रात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या पानटपऱ्यांवर सुगंधित तंबाखू टाकून पानांची विक्री करण्यात येते. या ठिकाणी सर्व ब्रॅण्डचा तंबाखू ग्राहकांना सहज उपलब्ध होतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली.शाळा, कॉलेजजवळ तंबाखूची विक्रीसिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३ मधील कलम ६ (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या १०० मीटर परिघामध्ये तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीला बंदी आहे. यात सिगारेटचाही समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील बहुतेक महाविद्यालयांजवळील पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सर्रास होताना दिसते.

धाडीची कारवाई निरंतर प्रक्रियाविभागाच्यावतीने प्रतिबंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. धाडीची कारवाई ही विभागाची निरंतर प्रक्रिया आहे. पानटपऱ्यांना सील लावण्याच्या कारवाईनंतर चालकांमध्ये धडकी भरली होती. नागरिकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्यांवर आता धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी