शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:26 IST

पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली.

ठळक मुद्देचार महिन्यांपासून होता फरार : पश्चिम बंगालच्या हुगलीत झाली होती घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली.मो. अकरम इसराईल (३३) रा. हुगली, पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. २९ जूनला हुगलीत टीएमसी नेता दिलीप राम यांचा गोळी घालून खून करण्यात आला होता. दिलीप रामची पत्नी हुगली ग्रामपंचायतची प्रमुख आहे. दिलीप हे टीएमसीचे नेते होते. त्यांच्या खुनानंतर हुगलीत तणाव निर्माण झाला होता. टीएमसी समर्थकांनी हुगली बंद करून भाजपा कार्यकर्त्यांवर दिलीप यांच्या खुनाचा आरोप लावला होता. आरोपींना त्वरित अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली होती. अकरमचा एक नातेवाईक तहसिल पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. दिलीपच्या खुनानंतर अकरम हुगलीतून फरार झाला. तो काही दिवस नातेवाईकांकडे लपला. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या घरी धाड टाकली. त्यांना आरोपी नाल साहब चौकाजवळ आढळला. अटक केल्यानंतर चौकशीत त्याने दिलीप राम खुनात फरार असल्याची कबुली दिली. तहसिल पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांना सूचना दिली आहे. ते येथे पोहोचल्यानंतर अकरमला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अकरम कुख्यात आरोपी असून त्याच्या विरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत. अकरम पूर्वीपासून टीएमसीशी निगडित होता. पश्चिम बंगालमध्ये राजकारणात सुरु असलेल्या घडामोडीतून यापूर्वीही अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. याच घडामोडीतून दिलीप राम यांचा खुन झाल्याची शंका आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिकाMurderखूनArrestअटकnagpurनागपूर