शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

इस बार ईद 'सादगी' से...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:19 IST

पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे.

ठळक मुद्देइस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख स्तंभ (अरकान) आहेत. कलमा हा मंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे तर वर्षातून एक महिना उपवास ठेवायला हवे. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्याने आयुष्यात कि

आमीन चौहानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्र दर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच रमजानची सुरवात होते. चांद नजर आ गया... असं म्हणत प्रत्येकजण रमजान प्रारंभाचा आनंद व्यक्त करीत असतो.रात्रीच्या म्हणजे इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची 20 रकात नमाज अदा करावी लागते. तिला 'तरावीह' असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम साहेब कुराणाच्या ओवींचे सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक मुस्लिमाच्या कानावर वषार्तून किमान एकवेळ कुराणाचा पवित्र संदेश पडत असतो. प्रत्येक मशिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी लोकांची गर्दी पाहता दोन पाळीत 'ही' नमाज अदा केली जाते.रोजा हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ काढल्या जातो. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोज्यांचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त फाका (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवन पध्दती आहे. ती एक आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असताना बराच वेळा बिनधास्त होवून जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठिण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करित असतो अगदी तसेच इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी या मागे धारणा आहे.या वर्षीचे रोजे हे परिक्षा पाहणारेच होते. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना यावेळी रोजेदारांना राहावे लागले. दरवेळी 13 ते 14 तास उपवासाचा काळ असतो. यावर्षी तब्बल पावणे पंधरा तास उपवास चालला.यंदाचा रमाजान एप्रिल आणि मे महिन्यात वाटल्या गेला होता. पुढील वर्षीही रमजान एप्रिल आणि मे महिन्यातच असेल. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या 10 दिवस आधी येतो. अशा प्रकारे 10 दिवसाने रमजान मास दरवर्षी पुढे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतू पुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिण्यात, प्रत्येक ऋतूत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीत सुध्दा असेल आणि त्याहीपुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण येईल. 35 ते 40 वर्षांनी रमजानचे एक चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिण्यात आणि प्रत्येक ऋतूत रमजानचे असे फिरणे हे त्याचे 'अद्वितीय' असे वैशिष्ट्य होय.रमजान मधील सर्वात महत्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे टॅक्स. तुम्हाला समाजात जगायचे असेल तर समाजातील बºया, वाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समाजासाठी महत्वाचा असून समाजातील लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट उल्लेख कुराणात आहे.कोरोनाचा कठिण काळ यावेळी रमजानमध्ये अनुभवायला मिळाला. इस्लाममध्ये पुरुषांनी एकत्र येवून नमाज अदा करण्याला मोठं महत्व आहे. दिवसातून पाच वेळा, आठवड्यातून एकदा आणि वषार्तून दोनदा असं एकत्र येवून सामुहिक नमाज अदा केल्या जातात. पण अशा एकत्र येण्यावरच कोरोनात बंदी असल्याने मुस्लिमांच्या संयंमाची मोठी परीक्षा घेणारा हा रमजान ठरला. या रमजानमध्ये पहिल्यांदा सामुहिक नमाज पूर्णत: बंद ठेवण्यात आली. रमजान मधील प्रत्येक रात्रीची तरावीहची नमाज सर्वां(जमात)सोबत अदा करण्याचा आनंद आणि पुण्य ही मोठं! पण कोरोनामुळे यावेळी तरावीह घरीच अदा करावी लागली. यावेळी पहिल्यांदाच पवित्र रमजान ईदची नमाज सुध्दा एकत्रित अदा केली जाणार नाही.इफ्तार (उपवासाचे पारणे) आणि सेहरी (सकाळची न्याहरी) एकत्र करणे या सर्व बाबी टाळाव्या लागल्या. इफ्तार पार्ट्यांना पूर्ण विराम देणे या रमजान मध्ये क्रमप्राप्तच होते. मुसाफा (दोन्ही हाताचा शेकहँड), अलिंगन या इस्लामी वागणूकीच्या काही बाबी. पण त्यांनाही कोरोनामुळे मुस्लिम बांधवांना मुकावे लागले. तसेच रमजान आणि ईदच्या आनंदाला बाजूला सारत मोठ्या प्रमाणात गरीबांना जेवण, आवश्यक धान्यादी साहित्य वाटप करुन मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात समाजातील गोरगरीब, गरजू, निराधार, महिला, वृध्द, अनाथ, अपंग, बेरोजगार आणि प्रवासी मजुरांना दिला आहे. आपल्या रमजान आणि ईदच्या खरेदीमुळे बाजारातील अनावश्यक गर्दी वाढेल आणि कोरोना वाढीस आणखी एक कारण मिळेल यामुळे कहो हर आदमी से, इसबार ईद सादगी से असा ट्रेंड समाजातील काहींनी जाणीवपूर्वक समाज माध्यमांमधून सर्वदूर पसरविला... आणि त्याला कधी नव्हे तो उदंड प्रतिसाद मुस्लिम समाजातून मिळाला. 

टॅग्स :Muslimमुस्लीम