शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, मोर्चा मात्र निघालाच नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 21:20 IST

Tight security by the police, Gittikhadan, crime news उपराजधानीतील सामाजिक साैहार्द बिघडवू पाहणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने काही सामाजिक संघटना मोर्चा काढणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गिट्टीखदानमध्ये जोरदार बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येत सुरक्षा बलही तैनात करण्यात आले, मात्र मोर्चा निघालाच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - उपराजधानीतील सामाजिक साैहार्द बिघडवू पाहणाऱ्या विषयाच्या अनुषंगाने काही सामाजिक संघटना मोर्चा काढणार असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गिट्टीखदानमध्ये जोरदार बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येत सुरक्षा बलही तैनात करण्यात आले, मात्र मोर्चा निघालाच नाही.

गिट्टीखदानमधील एका समाजकंटकाचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटली. त्या समाजकंटकाच्या घरावर मोठा जमाव धडकला. दगडफेक करून आरोपीच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आली. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात आरोपी समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या पीसीआरची मुदत आज संपणार होती. त्यामुळे पोलीस त्याला न्यायालयात हजर करण्याच्या तयारीत असतानाच गिट्टीखदानमध्ये मोठा मोर्चा काढला जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, गिट्टीखदानमध्ये दुपारी १२ वाजतापासून जागोजागी बॅरिकेडस् लावण्यात आले. मोठा पोलीस ताफा नियुक्त करण्यात आला. ठिकठिकाणी नाकेबंदीही करण्यात आली. मोर्चा निघाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस सज्ज होते, मात्र मोर्चा निघालाच नाही. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला.

व्यापाऱ्यांचाही सकारात्मक प्रतिसाद

मोर्चात कोण कुठून सहभागी होणार याची पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती. मात्र कुणी समाजकंटक दगडफेक किंवा दुसरा कोणता आक्षेपार्ह प्रकार करून वातावरण चिघळवू शकतो, याची कल्पना असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. सायंकाळपर्यंत कुठलाही मोर्चा न आल्याने व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसMorchaमोर्चा