शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातले वनक्षेत्र अन वाघही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:20 IST

यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे२५० वर पोहोचले वाघ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघ वाढले असून यंदा २५० च्या वर वाघांची संख्या पोहोचली आहे. हे मोठे वाघ असून ज्यांची मोजणी होत नाही, असे लहान वाघही १०२ वर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.वन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या कार्यक्रमांसदर्भात बुधवारी वनामती येथे नागपूर विभाग आणि अमरावती विभागाचा आढावा त्यांनी घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आ. अनिल सोले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, वनांचे क्षेत्र वाढत असल्यामुळे वाघांची संख्याही वाढत आहे. राज्यात वाघांची संख्या वाढली असून पुढील पाच वर्षे वाघांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेतल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची माहितीही त्यांनी दिली.

दारूबंदी उठवण्यावरून काँग्रेसला चिमटामहाराष्ट्रात चंद्रपूर येथून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले ‘काँग्रेसचे सदस्य होताना मी दारू पिणार नाही, असे लिहून द्यावे लागते. पावती बुकात तशी नोंदही आहे. त्यानंतर सदस्य झाल्याचे पावती बुक मिळते. काँग्रेस आता सदस्य होण्याचे ते पावती बुक फेकणार आहे का, असा सवाल करीत चिमटा काढला.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार