शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हुडकेश्वरमध्ये वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:58 IST

शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळून आले. या घटनेनंतर हुडकेश्वर गावाच्या परिसरात रात्री वाघ फिरत असल्याची चर्चा पसरली. यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच धास्तावले असून सायंकाळनंतर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. वनविभागाच्या सेमिनरी हिल्सच्या चमूला या संदर्भात माहिती प्राप्त होताच या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र पगमार्क कोणत्या प्राण्याचे आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही. हे पगमार्क वाघाचे की बिबट्याचे यावर एकमत नाही. अशातच हुडकेश्वर, पिपळा आणि बहादुरा आदी गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याचे पाहिल्याची गावकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पसरली आहे. वनविभागाच्या पथकाने या परिसरात गस्त केली. परिसरात पाच कॅमेरा ट्रॅपही लावले. अद्याप कोणताही प्राणी आढळला नाही.कॅमेरा ट्रॅपमध्ये प्राणी नाहीआरएफओ विजय गंगावने यांनी दिलेल्या महितीनुसार, गावकऱ्यांकडून माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी केली. मात्र तिथे पगमार्क आढळले नाहीत. या नंतर दोन दिवसांपासून परिसरात पाच कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. अपेक्षित प्राणी न दिसल्यास हे कॅमेरे हटविले जातील.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर