शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काेअर झाेनमधील पर्यटनबंदीला व्याघ्र प्रकल्पांचाच खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 08:20 IST

Nagpur News देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चा आदेश सर्व प्रकल्पांच्या प्रशासनाकडे धडकला आहे.

ठळक मुद्देवाघांचा प्रश्न, महसूल बुडण्याची भीती

निशांत वानखेडे

नागपूर : देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या काेअर झाेनमधील पर्यटन पूर्णपणे बंद करण्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चा आदेश सर्व प्रकल्पांच्या प्रशासनाकडे धडकला आहे. काेअर झाेनमध्ये पर्यटनाचा अतिरेक हाेत असल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे कारण त्यात आहे. मात्र, प्रकल्पांमध्ये आदेशाची अंमलबजावणी दिसत नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच ताे आदेश मान्य नाही का, असा सवाल निर्माण हाेत आहे.

केंद्रीय वने व पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ५ जानेवारी २०२२ ला एनटीसीएची १९ वी बैठक पार पडली. या बैठकीत व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन प्रबंधनाचे नियम कठाेरपणे लागू करण्याचे सूचित करण्यात आले. प्रकल्पांचे मुख्य क्षेत्र म्हणजे काेअर क्षेत्रात पूर्णपणे ‘नाे एन्ट्री झाेन’ असावे, असे आदेशात सांगण्यात आले. उर्वरित क्षेत्रातच पर्यटनाला परवानगी देण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. १५ फेब्रुवारीदरम्यान एनटीसीएचे आदेश देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांकडे पाेहोचले. मात्र, व्याघ्र प्रकल्पांमध्ये याबाबत सकारात्मकता दिसून येत नाही.

वाघ संवर्धन याेजनेतच समावेश

-व्याघ्र प्रकल्पांच्या व्याघ्र संवर्धन याेजनेच्या (टीसीपी) नियमावलीमध्ये आधीच वाघांच्या संवर्धनासह काेअर झाेनमधील पर्यटन टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या नियमाचा समावेश आहे.

-यासह बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांनाच प्रवेश आहे.

-रिसाॅर्टचे नियमन तसेच वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील नागरिकांना राेजगाराला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.

-सुरक्षित क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक.

-व्याघ्र प्रकल्पाच्या काेअर झाेनमध्ये केवळ २० टक्के पर्यटनाला परवानगी असून, टप्प्याटप्प्याने तेही बंद करण्यास सांगितले आहे.

-सुरक्षित पर्यटनाच्या आड काेअर क्षेत्रात माेठ्या प्रमाणात पर्यटनाला परवानगी देण्यात आली. हळूहळू पर्यटन लाॅबी तयार झाली.

-काेअर क्षेत्रात पर्यटनाचा अतिरेक झाला. काेअर झाेनजवळच श्रीमंतांचे रिसाॅर्ट तयार झाले.

-आतातर रात्रीचे पर्यटनही सुरू करण्याचा घाट घातला जात असून, यामुळे वन्यप्रेमींमध्ये असंताेष आहे.

म्हणून मानव-वन्यजीव संघर्ष

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते पर्यटनाच्या अतिरेकामुळे व्याघ्र संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. व्याघ्र संवर्धन हा मूळ उद्देश बाजूला पडून पर्यटन व महसूल याला प्राधान्य मिळत आहे. मानवी हालचाली वाढल्याने वाघांच्या व इतर वन्यजीवांच्या अधिवासावर फरक पडला.

टॅग्स :Tigerवाघ