शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:27 IST

राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९० वरून व्याघ्रसंख्या पोहचली ३१२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे.देशातील वाघांची संख्या २ हजार ९६७भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली, तेव्हा देशात १ हजार ४११ वाघ होते. सन २०१० साली दुसऱ्या गणनेमध्ये १ हजार ७०६, सन २०१४ साली तिसºया गणनेमध्ये २ हजार २२६ वाघ होते. आता २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे.व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. त्याचे हे फलित आहे.सुधीर मुनगंटीवार, वनमंत्रीव्याघ्रसंवर्धन आणि राज्येराज्य             पूर्वीची संख्या           आताची संख्यामध्यप्रदेश       ३०८                      ५२६कर्नाटक         ४०६                     ५२४उत्तराखंड       ३४०                     ४४२महाराष्ट           १९०                     ३१२तामिळनाडू     २२९                     २६४

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग