शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटी निर्वासित महिलांनी बांधली सरसंघचालकांना राखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:24 IST

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली.

नागपूर, 07 -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सोमवारी वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तिबेटी निर्वासित महिला तसेच अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनींनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना राखी बांधली. डोकलाम मुद्द्यावर चीनच्या सीमेवर वातावरण तापले असताना तिबेटी बांधवांच्या पाठीशी संघ भक्कमपणे उभे आहे, हाच संदेश यातून गेला. सकाळच्या सुमारास संघ मुख्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. वसुंधरा महिला वसतीगृहातील व मूळच्या अरुणाचलमधील रहिवासी असलेल्या ५ विद्यार्थिनी तसेच अर्जुनी मोरगावजवळील गोठणगाव येथील शिबीरात वास्तव्यास असलेल्या तिबेटी भगिनी यावेळी उपस्थित होत्या. चोग्याल चिंगटो, रिझिंग वोग्मो, थेअरिंग वोग्मो, यांगचेंन थोमवो आणि युटून कॅशिडोमा या भगिनींनी तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी सरसंघचालकांकडे विनंती केली. चीनने तिबेटमधील लोकांना विस्थापित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तर तेथे सैनिक सराव करुन तेथील स्थानिकांच्या मालमत्तेचे नुकसानेखील होत आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातदेखील चीनकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील भगिनींनी सरसंघचालकांना राखी बांधून पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. संघ परिवार तसेच केंद्र शासनाने चीनविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. केंद्राने डोकलामच्या मुद्द्यावरुन चीनला खडेबोल सुनावले आहे. तर संघ परिवाराने राष्ट्रीय स्वदेेशी सुरक्षा मोहिमेच्या माध्यमातून चीनी वस्तूंविरोधात दंड थोपटले आहेत. संघ आणि भारत तिबेटी बांधवासोबत असल्याचे आश्वासन यावेळी डॉ.मोहन भागवत यांनी दिले.