शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ठगबाज कोंडावारने आणखी एका दाम्पत्याला लावला चुना : ५९ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 00:06 IST

Thug Kondawar fraud another अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा ठगबाज गोपाल कोंडावार याने पुन्हा एका दाम्पत्याला फसवल्याचे उघड झाले आहे. पीडित दाम्पत्याने त्यांचे ५९ लाख रुपये हडपणाऱ्या कोंडावारविरुद्ध गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली आहे.

ठळक मुद्देसीताबर्डीत नवीन गुन्हा दाखल ; यापूर्वीही अनेक गुन्हेअटक, २४ पर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा ठगबाज गोपाल कोंडावार याने पुन्हा एका दाम्पत्याला फसवल्याचे उघड झाले आहे. पीडित दाम्पत्याने त्यांचे ५९ लाख रुपये हडपणाऱ्या कोंडावारविरुद्ध गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली आहे.

काटोल मार्गावर राहणाऱ्या प्रतिभा नीलकमल महतो (वय ५८) यांच्या तक्रारीनुसार, मे. जगदंबा रियलेटर्स प्रा. लि. चा प्रमुख असलेल्या गोपाल लक्ष्मण कोंडावार याने २९ मार्च २०१४ ला मौजा मांगरूळ येथील त्याच्या कंपनीचे चार भूखंड विकत देण्याचा सौदा केला. तीन वर्षांनंतर हेच भूखंड दुप्पट किमतीत परत विकत घेणार असल्याचे कागदोपत्री करारपत्रही महतो यांना करून दिले. यावेळी आरोपीने बनावट सात बाराही तयार करून दिला होता. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर २०१७ मध्ये महतो दाम्पत्याने कोंडावारला ते भूखंड परत घेऊन आमची रक्कम आम्हाला द्या, असे म्हटले असता तो टाळाटाळ करू लागला. त्याचे वर्तन संशयास्पद असल्यामुळे महतो दाम्पत्याने तलाठ्याकडे सातबारा दाखवला असता तो बनावट असल्याचे आणि आरोपी कोंडावारने महतो यांना विक्री करून दिलेले भूखंड पुन्हा इतर व्यक्तींनाही विकल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महतो दाम्पत्याने कोंडावारकडे पैशासाठी तगादा लावला. तब्बल चार वर्षे त्याने वेगवेगळे कारण सांगून पीडित दाम्पत्यांना टाळले. तो रक्कम परत करणार नाही, हे लक्षात आल्यामुळे प्रतिभा नीलकमल महतो यांनी गोपाल कोंडावारविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी बुधवारी कोंडावार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा २४ मे पर्यंत पीसीआर मिळवला. उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख या प्रकरणाचा तपास करीत आहे.

विशेष म्हणजे, कोंडावारने अशाच प्रकारे वेगवेगळ्या व्यावसायिकांना भूखंड विकून त्यांच्याकडून लाखो रुपये हडपले आहे. ३६ महिन्यात हेच भूखंड तुमच्याकडून परत विकत घेईल आणि तुम्हाला त्याची दुप्पट रक्कम देईल, असे तो स्टॅम्प पेपरवर लिहून देत असल्यामुळे त्याच्यावर कोणीही विश्‍वास करत होता. त्याचमुळे त्याने अनेकांचा विश्वासघात करून त्यांची रक्कम हडपली.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक