शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मकरसंक्रांतीच्या माध्यमातून रा.स्व. संघ मतदारांशी ‘धागा’ जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 10:31 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शाखांऐवजी शहरातील विविध वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.

ठळक मुद्दे उत्सवाच्या स्वरूपात बदल शाखांऐवजी शहरातील दोनशेहून अधिक वस्त्यांमध्ये होणार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शाखांऐवजी शहरातील विविध वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी मतदारांशी संवादाचा धागा जोडण्यात येणार आहे, अशीच चर्चा आहे.संघाकडून विजयादशमीसह गुरुपौर्णिमा, वर्षप्रतिपदा, रक्षाबंधन व मकरसंक्रांत हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. मकरसंक्रांतच्या कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या शाखांमध्ये करण्याची परंपरा आहे. शाखेतील स्वयंसेवक घरूनच तीळगूळ आणतात व त्याचे वितरण लोकांमध्ये होते. मात्र या वर्षी याचे स्वरूप बदलण्यात आले आहे. आता शाखांच्याऐवजी विविध वस्त्यांमध्ये या उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा यामागचा उद्देश आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे, असे मानण्यात येत आहे. यासंदर्भात विश्व संवाद केंद्राचे प्रमुख अतुल पिंगळे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. संघात उत्सव साजरे केले जातात व जनतेला यात समाविष्ट करून घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

२७५ वस्त्यांवर ‘फोकस’शहरातील सुमारे २७५ वस्त्यांमध्ये मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा करण्याची योजना आहे. यात अल्पसंख्यांकबहुल भागांचादेखील समावेश आहे. संघ या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षात २२० वस्त्यांमधील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाली आहे.हिंदूंना संघटित करण्याचा दावासंघाकडून मकरसंक्रांत उत्सवाच्या पत्रिका छापण्यात आल्या आहेत. हिंदूंना संघटित करण्यासाठी संघाकडून नागरिकांच्या वस्त्यांमध्ये मकरसंक्रांत उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, असे यात नमूद आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ