शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दानागंज मॉल उभारणीसाठी तीन वर्षांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 22:10 IST

Danaganj Mall extension जुना भंडारा रोड येथील दानागंजमध्ये महापालिकेच्या शॉपिंग मॉलचे काम करण्याला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय  महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देमनपाच्या सभेत गुडधे यांचा करारातील त्रुटीवर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुना भंडारा रोड येथील दानागंजमध्ये महापालिकेच्या शॉपिंग मॉलचे काम करण्याला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय  महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, वर्ष २००७ मध्ये पाच माॅलचे निर्माण प्रस्तावित होते. परंतु यातील फक्त दानागंज माॅलचे काम सुरू करता आले. यात अनेक अडचणी आल्या. मनपास्तरावरही यावर तोडगा काढता आला नाही. यामुळे पुन्हा वर्ष २०२३-२४ पर्यंत दानागंज मॉलचे काम करण्याला मुदतवाढ द्यायला हवी. वास्तविक करारात काही बाबतीत चुका झाल्या आहेत. परंतु हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. यादरम्यान काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी या प्रस्तावात ६०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप करीत, करारातील त्रुटीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

सभागृहात मॉलच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली. गुडधे यांच्यासह विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही प्रस्तावाला विरोध केला. गुडधे यांनी फायनान्शियल क्लोजर ते हप्त्यांच्या रकमेवर १६ टक्के दंड करण्याची तरतूद करणे, प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण केला नसतानाही विकासकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. प्रस्तावात घोटाळा असल्याने मूळ प्रस्ताव रद्द करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुडधे यांनी केली.

नदीकाठावरील अतिक्रमण हटवा

विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी नोटीसच्या माध्यमातून शहरातील वाहणाऱ्या नद्यांच्या काठावर अतिक्रमण करणाऱ्यांनी कब्जा केला असल्याचा प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे चारचाकी वाहनांचा व्यवसाय करणाऱ्यांनी नदीकाठावर दुकाने थाटली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वनवे यांनी केली. नासुप्रच्या जागेवरही अतिक्रमण आहे. याचा विचार करता मनपा, वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याला सहमती दर्शविली. या बैठकीनंतर २० ते ३० दिवस अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश महापौरांंनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका