शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत उष्माघाताचे तीन बळी! प्रशासन म्हणते शवविच्छेदन अहवाल येऊद्या

By सुमेध वाघमार | Updated: May 19, 2023 18:15 IST

Nagpur News उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून मागील तीन दिवसांत उष्माघाताचा तीन मृत्यूची नोंद झाली.

सुमेध वाघमारे नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून मागील तीन दिवसांत उष्माघाताचा तीन मृत्यूची नोंद झाली. परंतु मनपाच्या आरोग्य विभाग याकडे उष्माघाताचे संशयित मृत्यू म्हणून पाहत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच याची पुष्टी करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    ‘हीट एग्जशन’ म्हणजे, उष्णता ग्रस्त होणे. ही एक अशी अवस्था आहे ज्याचा लक्षणांमध्ये शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो आणि पल्स रेट वाढतो. उन्हाळ्यात खूप जास्त तापमानाच्या संपर्क आल्यावर अशी लक्षणे दिसून येतात. उन्हाळ्यात दिसून येणाºया तीन ‘सिंड्रोम्स’ पैकी हे एक आहे. यासोबत ‘हिट क्रॅम्प्स’ आणि ‘हीट स्ट्रोक’ही (उष्माघात) आढळून येतात. यात उष्माघात सर्वात घातक ठरतो. मागील चार दिवसांतील नागपूरचे तापमान ४२ ते ४३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.     

        मनपाच्या आरोग्य विभागाकडे मागील तीन दिवसांत तीन संशयित उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली. यातील दोन रुग्ण मेडिकलच्या पसिरात मृतावस्थेत आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू हा गांधीबाग झोन परिसरात झाला. यातील एका मृताची ओळख पटली असून तो जाटतरोडी येथील रहिवासी आहे. उर्वरीत दोन मृताची ओळख पटलेली नाही. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आले आहे.  शवविच्छेदन अहवालावरूनचा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

-उष्माघाताची लक्षणे  रखरखत्या उन्हात कठोर शारीरिक श्रम करण्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. याची लक्षणे अचानक किंवा हळहळूही समोर येऊ शकतात. यात खूप घाम येणे, चक्कर येणे, थकावट वाटणे, उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होणे, मासपेशी आकडणे, मळमळ वाटणे आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत. 

   -कोणाला धोका होऊ शकतो?उष्माघात कोणालाही होऊ शकतो. परंतु चार वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसीत झालेली नसते तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरुप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते.

टॅग्स :Deathमृत्यू